मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Rakesh Jhunjhunwala यांच्या या शेअरने यावर्षी दिलाय तिप्पट रिटर्न, तुम्ही खरेदी केलाय का?

Rakesh Jhunjhunwala यांच्या या शेअरने यावर्षी दिलाय तिप्पट रिटर्न, तुम्ही खरेदी केलाय का?

कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग कंपनी मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शनच्या शेअर्सने यावर्षी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा (Investment Multibagger stock) दिला आहे. या वर्षी आतापर्यंत मॅन इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स 220 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर: चांगला परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार गेल्या काही काळापासून शेअर बाजारात (Return in Share Market) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग कंपनी मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शनच्या शेअर्सने यावर्षी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा (Investment Multibagger stock) दिला आहे. या वर्षी आतापर्यंत मॅन इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स (man infra share) 220 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. गेल्या सहा महिन्यांत या स्टॉकचा भाव 182 टक्क्यांनी (man infra share Price) वाढला आहे. गेल्या एका वर्षात यात 338 टक्के वाढ झाली आहे. एका शेअरची किंमत 110 रुपये मॅन इन्फ्रास्ट्रक्चर ही देशातील एक अग्रगण्य बांधकाम कंपनी आहे जी पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, निवासी, औद्योगिक, व्यावसायिक आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा प्रकल्पांसाठी बांधकाम सेवा प्रदान करते. एक वर्षापूर्वी, 15 ऑक्टोबर 2020 रोजी बीएसईवर मॅन इन्फ्राचे शेअर्स 25.20 रुपये होते, जे आता 110 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहेत. वाचा-PM Kisan: शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्ताची बातमी! यादिवशी मिळणार 2000 रुपये गेल्या एका महिन्यात देखील, हा स्टॉक 30% पेक्षा जास्त वाढला आहे आणि या काळात त्याची किंमत 84 रुपयांवरून 110 रुपये झाली आहे. अलीकडेच कंपनीच्या बोर्डाने 1: 2 च्या प्रमाणात बोनस इक्विटी शेअर्स जारी करण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय कंपनीने प्रत्येक शेअरवर 1.26 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. गुंतवणूकदार झाले लखपती मॅन इन्फ्राच्या शेअर किमतीचा इतिहास पाहिला तर जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक वर्षापूर्वी त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर ती रक्कम वाढून 4.38 लाख रुपये झाली असती. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 जानेवारी 2021 मध्ये त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख रुपये आज वाढून 3.20 लाख रुपये झाले असते. वाचा-दिवाळी होणार गोड! या कर्मचाऱ्यांना 3 ठिकाणाहून येणार पैसे; सरकार जारी करणार पैसे झुनझुनवाला यांच्याकडे 1.21% भागीदारी  सप्टेंबर 2021 पर्यंत बीएसईच्या वेबसाइटवरील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, गुंतवणूक दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्याकडे (Rakesh Jhunjhunwala Portfolio) कंपनीमध्ये 30 लाख शेअर्स अर्थात 1.21% भागीदारी आहे. एप्रिल-जून तिमाहीतही ही भागीदारी एवढीच होती.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Share market

    पुढील बातम्या