मराठी बातम्या /बातम्या /मनी /

खूशखबर! LPG गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर निश्चित Cashback, वाचा कसं कराल बुकिंग?

खूशखबर! LPG गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर निश्चित Cashback, वाचा कसं कराल बुकिंग?

तुम्ही LPG गॅस सिलेंडरच्या खर्चातून काही रक्कम कमी करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर तुम्हाला महागड्या गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर 50 रुपयांपर्यंतचा निश्चित कॅशबॅक मिळू शकतो.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 16 ऑक्टोबर: सामान्यांना सध्या महागाईचा सामना करावा लागत आहे. अशातच वाढते एलपीजी गॅस सिलेंडरचे दर (LPG Gas Cylinder Price Today) त्यांच्या खिशाला चाप देणारे ठरत आहेत. अशावेळी छोट्यात छोटी काटकसर करण्याचा सामान्यांचा (Save Money on LPG Gas) प्रयत्न असतो. तुम्ही देखील LPG गॅस सिलेंडरच्या खर्चातून काही रक्कम कमी करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर तुम्हाला महागड्या गॅस सिलिंडरच्या बुकिंगवर 50 रुपयांपर्यंतचा निश्चित कॅशबॅक मिळू शकतो. सध्या 14.2 किलोच्या गॅस सिलेंडरची किंमत 899.50 रुपये आहे. यामध्ये तुम्ही 50 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता.

डिजिटल पेमेंट सुविधा पुरवणाऱ्या पॉकेट्स अॅपद्वारे (Pockets App) ग्राहकांना गॅस सिलेंडर बुकिंगवर 10 टक्के (कमाल 50 रुपये) कॅशबॅक मिळू शकतो. हे अॅप ICICI बँकेद्वारे (ICICI Bank) संचालित आहे.

टॅलेंटच्या शोधात आयटी कंपन्या! 1 लाखांपेक्षा अधिक जणांना देणार नोकऱ्या

ऑफर काय आहे?

जर तुम्ही पॉकेट्स अॅपद्वारे 200 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त गॅस बुकिंगसह कोणत्याही प्रकारचे बिल पेमेंट केले तर तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक मिळेल. ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कोणताही प्रोमोकोड टाकण्याची गरज नाही. या ऑफरद्वारे तुम्ही जास्तीत जास्त 50 रुपयांचे कॅशबॅक मिळवू शकता. ही ऑफर फक्त पॉकेट्स अॅपद्वारे महिन्याच्या 3 बिल पेमेंटवर वैध असेल.

कशी कराल बुकिंग?

1. तुम्हाला तुमचे पॉकेट्स वॉलेट अॅप उघडावे लागेल.

2. यानंतर, रिचार्ज आणि पे बिल्स सेक्शनमध्ये पे बिल वर क्लिक करा.

3. यानंतर Choose Billers मध्ये More चा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

4. यानंतर LPG चा पर्याय तुमच्या समोर येईल.

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्ताची बातमी! यादिवशी मिळणार 2000 रुपये

5. आता सर्व्हिस प्रोव्हायडरची निवड करावी लागेल. यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल.

6. आता तुमच्या बुकिंगची रक्कम प्रणालीद्वारे कळवली जाईल.

7. यानंतर तुम्हाला बुकिंगची रक्कम भरावी लागेल.

8. व्यवहारानंतर 10 टक्के दराने जास्तीत जास्त 50 रुपयांचा कॅशबॅक रिवॉर्ड मिळेल.  तो उघडताच कॅशबॅकची रक्कम तुमच्या पॉकेट्स वॉलेटमध्ये जमा केली जाईल. हा कॅशबॅक बँक खात्यात देखील ट्रान्सफर केला जाऊ शकतो.

First published:

Tags: LPG Price