मराठी बातम्या /बातम्या /मनी /

लॉकडाऊनमध्ये करा या शेअर्समध्ये गुंतवणूक, जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचा सल्ला

लॉकडाऊनमध्ये करा या शेअर्समध्ये गुंतवणूक, जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचा सल्ला

लॉकडाऊनच्या (Coronavirus Lockdown) काळात तज्ज्ञांच्या सल्ल्यांनुसार शेअर बाजारात गुंतवणूक करणे नक्कीच फायद्याचे ठरेल.

लॉकडाऊनच्या (Coronavirus Lockdown) काळात तज्ज्ञांच्या सल्ल्यांनुसार शेअर बाजारात गुंतवणूक करणे नक्कीच फायद्याचे ठरेल.

लॉकडाऊनच्या (Coronavirus Lockdown) काळात तज्ज्ञांच्या सल्ल्यांनुसार शेअर बाजारात गुंतवणूक करणे नक्कीच फायद्याचे ठरेल.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 21 एप्रिल : लॉकडाऊनच्या (Coronavirus Lockdown) काळात तज्ज्ञांच्या सल्ल्यांनुसार शेअर बाजारात गुंतवणूक करणे नक्कीच फायद्याचे ठरेल. सीएनबीसी आवाज बाजार बंद होण्याच्या शेवटच्या अडीच तासामध्ये शेअर मार्केटमधून भरभक्कम पैसे कमवण्यासाठी विविध टिप्स देत असते. यानुसार बाजारातील चढउताराचा अंदाज लावून तुम्ही योग्य ठिकाणी पैशांंची गुंतवणूक करू शकता. मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार काही तज्ज्ञांच्या मते तुम्ही खालीलप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकाल-

-KiranJadhav.com चे किरण जाधव यांच्या माहितीनुसार किर्लोस्करमध्ये चांगली तेजी पाहायला मिळत आहे. या शेअरमध्ये 67 रुपयांच्या टारगेटसाठी खरेदी केली जाऊ शकते.

(हे वाचा-कच्च्या तेलाचे दर घसरल्यामुळे सोन्याच्या किंमती वाढल्या,जाणून घ्या मंगळवारचे भाव)

-Panorama Technicals चे अल्पेश फुरिया यांच्या माहितीनुसार esab india मध्ये 1149  रुपयाच्या स्टॉपलॉस बरोबर या शेअरमध्ये 1275 रुपयांच्या टारगेटसाठी खरेदी केली जाऊ शकते. बीईएलमध्ये 71 रुपयांच्या स्तरावर स्टॉपलॉस लावून खरेदी करा. यामध्ये पोझिशनल दृष्टीने 91 रुपयांचे टारगेट साध्य होऊ शकते.

-इंफोसिसमध्ये 630 रुपयांच्या स्टॉपलॉसने खरेदी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. रिलायन्समध्ये सध्याच्या स्तरावर ब्रेकआउट बघायला मिळत आहे. त्यामुळे या शेअरमध्ये खरेदी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

(हे वाचा-टाटांचे मोबाइल पेट्रोल पंप लॉकडाऊनमध्ये हिट,पुण्यातील स्टार्टअप देतंय घरपोच इंधन)

-एचडीएफसी बँकेमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे त्यांनी या शेअरमधून 990 रुपयांचे लक्ष्य प्राप्त होऊ शकते. त्यानंतर हे शेअर्स 1020 रुपयांच्या स्तरापर्यंत पोहचू शकतात. त्याचप्रमाणे सध्याचे गुंतवणूकदार या शेअरमध्ये सध्याच्याच स्तरावर खरेदी करू शकतात.

-भारत फोर्जने 260 रुपयांच्या स्तरावर चांगला ब्रेकआऊट दिला आहे. जर या शेअरने 300  रुपयांचा टप्पा पार केला तर 335 रुपयांच्या स्तर सहजगत्या पार होईल. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल.

संपादन - जान्हवी भाटकर

First published:

Tags: BSE, Share market