नवी दिल्ली, 21 एप्रिल : आतंरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे मुल्य वधारल्यामुळे आणि अमेरिकन कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम भारतातील सोन्याच्या फ्यूचर मार्केटवर झाला आहे. फ्यूचर मार्केटमध्ये जूनच्या सोन्याच्या किंमतीमध्ये आज वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. 21 एप्रिलला सुरूवातीच्या सत्रामध्ये (सकाळी 9.20 वा.) एमसीएक्स (MCX)वर जूनमधील सोन्याच्या किंमतीमध्ये 0.54 टक्क्यांनी वाढ होऊन सोनं प्रति तोळा 45,963 रुपयांवर ट्रेड करत होते. तर चांदीमध्ये 0.32 टक्क्यांनी वाढ होत चांदीची जूनची किंमत 42,873 रुपये प्रति किलो इतकी होती.
(हे वाचा-सोनं वा शेअर बाजारात नाही तर इथे करा गुंतवणूक,होईल करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण)
सोमवारी WTI च्या कच्च्या तेलाच्या किंमतींनी निच्चांक गाठल्याने त्याचा परिणाम या मौल्यवान धातूंंच्या किंमतीवर झाला आहे. कमोडिटी फ्यूचर मार्केटमध्ये WTI च्या किंमती पहिल्यांदा एवढ्या कमी पातळीवर गेल्या आहेत. परिणामी एप्रिल कॉन्ट्रॅक्टवर नकारात्मक परिणाम झाला आहे. मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोज जैन या मार्केट एक्सपर्टनी अशी माहिती दिली आहे की, 'भंडारण क्षमता कमी असल्यामुळे (कच्च्या तेलाच्या) एप्रिल कॉन्ट्रॅक्टवर नकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंकडे सुरक्षित गुंतवणूक किंवा Safe haven गुंतवणूक म्हणून पाहिलं जात आहे. सोन्याची वायदा किंमत 1700 डॉलर प्रति ट्रॉय औंसच्या पलिकडे गेली आहे.' सोन्याच्या किंमती अस्थिर राहण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
(हे वाचा-कोरोनाच्या विळख्यामुळे कच्च्या तेलाने गाठला निच्चांक, किंमत आणखी उतरण्याची भीती)
रिलायन्स सिक्युरीटीजचे सीनिअर रिसर्च अनालिस्ट असणाऱ्या श्रीराम अय्यर यांच्या माहितीनुसार, आशियायी बाजारात आंतरराष्ट्रीय बुलियन किंमती किरकोळ कमी होऊ लागल्या आहेत. कारण मंगळवारी सकाळच्या सत्रात अमेरिकन डॉलरमध्ये स्थिरता होती.
संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.