जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पालकांना महागाईचा आणखी एक झटका; स्कूल बसच्या भाड्यात 10 टक्के वाढ होणार?

पालकांना महागाईचा आणखी एक झटका; स्कूल बसच्या भाड्यात 10 टक्के वाढ होणार?

फाईल फोटो

फाईल फोटो

स्कूल बस ओनर्स असोसिएशनने दिवाळीनंतर विद्यार्थ्यांसाठीच्या बस भाड्यात 10% वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सीएनजीच्या दरात अलीकडेच झालेल्या वाढीचा त्यांना मोठा फटका बसला आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 08 ऑक्टोबर : स्कूल बस ओनर्स असोसिएशनने दिवाळीनंतर विद्यार्थ्यांसाठीच्या बस भाड्यात 10% वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सीएनजीच्या दरात अलीकडेच झालेल्या वाढीचा त्यांना मोठा फटका बसला आहे, यामुळे हा प्रस्ताव ठेवला गेला. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. “गेल्या वर्षभरात सीएनजीच्या किमतीत ३० रुपयांनी वाढ झाली आहे आणि ४ ऑक्टोबरच्या ताज्या वाढीमुळे किंमत ८६ रुपये प्रति किलो या उच्चांकावर पोहोचली आहे. यामुळे ऑपरेशनल कॉस्टमध्ये वाढ झाली आहे. म्हणून स्कूल बसची फी किमान 10% वाढवावी”, अशी मागणी स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अनिल गर्ग यांनी केली. दिवाळीआधी मोठा झटका! CNG-PNG च्या दरात पुन्हा वाढ पालकांसाठी हे एक मोठं ओझं ठरू शकतं कारण त्यांना जूनमध्येच सुमारे 20% फी वाढीचा सामना करावा लागला आहे. आता ही वर्षभरातील दुसरी वाढ ठरू शकते. एका बस ऑपरेटरने सांगितलं की एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान सीएनजीच्या दरात प्रति किलो 20 रुपये वाढ झाली होती. यामुळेच नवीन भाडेवाढीची मागणी केली जात आहे. दरवाढ लागू झाल्यास अतिरिक्त मासिक शुल्काचा बोजा किमान 200 रुपये प्रति महिना असू शकतो. “वार्षिक बस शुल्कासाठी एवढी मोठी रक्कम भरणे प्रत्येकासाठी सोपे नाही. मासिक किंवा त्रैमासिक भरण्याची सुविधा असावी, आवश्यक असल्यास त्याचं नूतनीकरण केलं जाऊ शकतं,” असं एका पालकांनी म्हटलं. दर महिन्याला कमी जोखमीसह शेअर्समध्ये गुंतवणूक करायची आहे? हा पर्याय ठरेल सर्वोत्तम शैक्षणिक वर्षाच्या मध्यात बस फी वाढीमुळे पालकांना पर्याय उरणार नाही. TOI ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. पालकांनी सांगितलं की “शाळांनी शाळेच्या बसेसची जबाबदारी घेणं फार पूर्वीपासून बंद केलं आहे. अर्ध शैक्षणिक वर्ष संपल्याने भाडेवाढ झाली तरी फार काही करता येणार नाही. अशा अचानक वाढीला ब्रेक लावण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शाळांनी भूमिका घेणं गरजेचं आहे,” असं एका पालकाने सांगितलं. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच बसचालकांनी शुल्कात वाढ केली होती आणि सेवा कमी झाल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या होत्या. “कोविडनंतर बस ऑपरेटर बेजबाबदार झाले आहेत. दर आठवड्याला मदतनीस आणि चालक बदलतात आणि फारच कमी जबाबदारी घेताना दिसतात,” असं एका पालकाने सांगितलं, ज्यांचा मुलगा अंधेरीतील एका शाळेत शिकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात