मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दर महिन्याला कमी जोखमीसह शेअर्समध्ये गुंतवणूक करायची आहे? हा पर्याय ठरेल सर्वोत्तम

दर महिन्याला कमी जोखमीसह शेअर्समध्ये गुंतवणूक करायची आहे? हा पर्याय ठरेल सर्वोत्तम

फाईल फोटो

फाईल फोटो

गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांसह, म्युच्युअल फंड हा गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्सद्वारे (SIP) गुंतवणूकदार त्यांचे पैसे म्युचुअल फंडमध्ये ठेवू शकतात

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 07 ऑक्टोबर : देशातील एकूण डिमॅट खात्यांनी प्रथमच 100 दशलक्षांचा टप्पा ओलांडला आहे. यावरून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग दिसून येत आहे. गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांसह, म्युच्युअल फंड हा गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्सद्वारे (SIP) गुंतवणूकदार त्यांचे पैसे म्युचुअल फंडमध्ये ठेवू शकतात. एसआयपीचे काही फायदे येथे दिले आहेत:

म्युच्युअल फंडांमध्येही जोखीम असते. मात्र, ही जोखीम थेट इक्विटी गुंतवणुकीतील जोखमीपेक्षा कमी असते. कारण, म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन व्यावसायिक फंड व्यवस्थापकांद्वारे केलं जातं. शिवाय, विविध कंपन्या आणि क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वितरीत केली जाते.

फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा लाखो रुपयांचे रिटर्न

मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता नाही

एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, एखाद्याला फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. कोणताही गुंतवणूकदार मासिक 100 रुपये रकमेसह एसआयपी सुरू करू शकतो. जास्तीतजास्त तुम्हाला पाहिजे तितकी रक्कम तुम्ही यामध्ये गुंतवू शकता. असं असलं तरी, मासिक एसआयपीच्या रक्कमेत मध्येच वाढ किंवा घट करता येत नाही. गुंतवणुकीची रक्कम वाढवण्यासाठी नवीन एसआयपी सुरू करता येते.

एसआयपीमुळे गुंतवणुकीची सवय लागते

तुम्ही एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडांत गुंतवणूक केल्यास, नियमित बचत किंवा गुंतवणुकीची सवय विकसित होण्यात मदत होते. कारण, दरमहा रक्कम गुंतवणं आवश्यक असल्यानं इतर खर्च कमी करण्यास मदत होते.

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाही योजनेचा निधी; काय आहे कारण?

ऑटो इन्व्हेस्टमेंट डीडक्शन

तुम्हाला दर महिन्याला ज्या दिवशी गुंतवणूक करायची आहे त्यासाठी तुम्ही कोणतीही तारीख निश्चित करू शकता. जर तुम्ही प्रत्येक महिन्याची 10 तारीख निश्चित केली असेल आणि तुमचं बँक अकाउंट म्युच्युअल फंड अकाउंटशी जोडलेलं असेल, तर एसआयपीची रक्कम त्या तारखेला खात्यातून आपोआप वजा केली जाईल. या सुविधेमुळे हप्ता चुकण्याची शक्यता राहत नाही.

इतर कोणत्याही गुंतवणुकीप्रमाणं ऑनलाइन प्रक्रिया करू शकता

तुम्ही ग्रो, झिरोधा, मोतीलाल ओसवाल इत्यादी प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन एसआयपी सुरू करू शकता. त्यासाठी केवळ केवायसीची आवश्यक असते. ही केवायसी प्रक्रिया ऑनलाइनदेखील करता येते. म्युच्युअल फंड एसआयपी सुरू करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. तुम्ही अॅपच्या डॅशबोर्डवर तुमच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा परफॉर्मन्सदेखील तपासू शकता.

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनडीएसएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएलएल) या डिपॉझिटरी फर्मनं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यामध्ये भारतातील एकूण डिमॅट खात्यांची संख्या 84 दशलक्ष होती. या महिन्यात 3.4 दशलक्ष नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली. फेब्रुवारी महिन्यामध्ये सुमारे 2.9 दशलक्ष, मार्च महिन्यामध्ये 2.8 दशलक्ष, एप्रिल महिन्यामध्ये 2.4 दशलक्ष, मे महिन्यामध्ये 2.7 दशलक्ष, जून महिन्यामध्ये 1.8 दशलक्ष, जुलै महिन्यामध्ये 1.8 दशलक्ष आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 2.2 दशलक्ष नवीन खाती उघडण्यात आली आहेत.

ऑगस्ट महिन्यामध्ये, भारतातील डेट म्युच्युअल फंडांमध्ये निधीची चांगली आवक दिसली. फिक्स्ड इन्कम फंडांना ऑगस्ट 2022 मध्ये एकत्रितपणे 49 हजार 164.29 कोटी रुपयांची निव्वळ रक्कम प्राप्त झाली. जी जुलैमधील चार हजार 930.08 कोटी रुपयांपेक्षा 897 टक्क्यांनी जास्त आहे. यापैकी, लिक्विड फंडांनी सर्वाधिक 50 हजार 095.82 कोटी रुपये मूल्य जमा केलं.

2022मधील दुसऱ्या तिमाहीत डेट म्युच्युअल फंडांत 70 हजार 213 कोटी रुपयांचा आउटफ्लो दिसला. डेट फंड हे सामान्यत: इक्विटीच्या तुलनेत कमी जोखमीच्या साधनांमध्ये म्हणजे कॉर्पोरेट आणि सरकारी बाँड्स, डेट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात.

तुम्हीदेखील मासिक गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय शोधत असाल तर एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता.

First published:

Tags: Investment, Savings and investments