जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / दिवाळीआधी मोठा झटका! CNG-PNG च्या दरात पुन्हा वाढ

दिवाळीआधी मोठा झटका! CNG-PNG च्या दरात पुन्हा वाढ

दिवाळीआधी मोठा झटका! CNG-PNG च्या दरात पुन्हा वाढ

CNG च्या दरात 3 रुपयांनी तर PNG च्या दरात 5 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. इंधनापाठोपाठ आता CNG आणि PNG चा दरात वाढ केली आहे. CNG च्या दरात 3 रुपयांनी तर PNG च्या दरात 5 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर शनिवारपासून लागू होणार आहेत. राजधानी दिल्लीत सीएनजीची किंमत 75.61 रुपयांवरून 78.61 रुपये झाली आहे. तर नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये किंमत 78.17 रुपयांवरून 81.17 रुपये मोजावे लागणार आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने 8 ऑक्टोबरपासून दिल्ली-NCR सह इतर काही शहरांमध्ये घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) आणि CNG च्या किमती वाढवल्या आहेत. सीएनजीच्या दरात किलोमागे तीन रुपयांची वाढ केली.

हा स्टॉक निघाला कुबेराचा खजाना! तुम्ही घेतला नसेल तर कराल पश्चाताप, वाचा कारण
जाहिरात

4 ऑक्टोबर रोजी मुंबईत CNG आणि PNGच्या दरात वाढ झाली आहे. त्याआधी पुण्यात CNG च्या दरात वाढ झाली होती. दिवाळीआधी दर वाढल्याने सर्वसामान्य लोकांचा खिसा रिकामा होणार आहे. मुंबईत सीएनजी 6 तर पीएनजी 4 रूपयांनी महागला आहे.

दर महिन्याला कमी जोखमीसह शेअर्समध्ये गुंतवणूक करायची आहे? हा पर्याय ठरेल सर्वोत्तम

मुंबईत 4 ऑक्टोबरपासून सीएनजी 86 रूपये प्रति किलो तर पीएनजीसाठी दर 52 रूपये 50 पैसे मोजावे लागत आहेत. कोटक इंस्टिट्यूशनल इक्विटीजच्या म्हणण्यानुसार एपीएस गॅसच्या किंमती एका वर्षात ५ पट वाढल्या आहेत. पुण्यात CNG सोमवारपासून 4 रुपयांनी महाग केला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नैसर्गिक गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. दुसरीकडे डॉलरचं मूल्य वाढलं असून रुपया नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. 1 डॉलरसाठी 82 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचा परिणामही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होत असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे महागाई वेगानं वाढत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदीचे संकेत दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात