Home /News /money /

'या' सरकारी बँकेत एफडी केली असाल तर होणार नुकसान, वाचा काय आहे कारण

'या' सरकारी बँकेत एफडी केली असाल तर होणार नुकसान, वाचा काय आहे कारण

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयने (SBI) 3 वर्षांंसाठी असणाऱ्या एफडीवरील (Fixed Deposit) व्याजदर 0.20 टक्क्यांनी कमी केला आहे

    नवी दिल्ली, 07 मे : देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयने (SBI) 3 वर्षांंसाठी असणाऱ्या एफडीवरील (Fixed Deposit) व्याजदर 0.20 टक्क्यांनी कमी केला आहे. बँकेचे हे नवे दर 12 मे पासून सुरू होणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या निवेदनात असे म्हटले आहे की, 'सिस्टिम आणि बँक लिक्विडिटी या बाबी लक्षात घेऊन आम्ही 3 वर्षाच्या कालावधीसाठी रिटेल टर्म डिपॉझिट्स रेटमध्ये ही कपात करत आहोत.' एसबीआय एफडीचे नवीन व्याजदर (SBI New FD Rates May 2020) सध्या एसबीआय (SBI) कडून 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.5 टक्के दराने व्याज मिळते.  46 ते 179 दिवसांसाठी 4.5 टक्के दराने व्याज मिळते. तर 180 दिवस ते एका वर्षासाठी ठेवण्यात आलेल्या एफडीवर 5 टक्के दराने व्याज मिळते. (हे वाचा-या बँकेच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका! लॉकडाऊनमध्ये कापला जाणार पगार) एक वर्ष ते 10 वर्षाच्या कालावधीदरम्यान मॅच्यूअर होणाऱ्या डिपॉझिट्सवर 5.7 टक्के व्याज देण्यात येत आहे. सर्व कालावधीच्या एफडींवर एसबीआयकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 बीपीएस (basis points) अर्थात 0.50 टक्के व्याज मिळते. याआधी एसबीआयने मार्च 2020मध्ये एफडीच्या व्याजदरामध्ये 20 ते 50 बीपीएसने कपात केली होती. 28 मार्चपासून हे नवे दर लागू करण्यात आले होते. त्याआधी 10 मार्च रोजी एसबीआयने व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली होती. MCLR मध्ये 0.15 टक्क्यांनी कपात एसबीआयने आज आणखी एक मोठी घोषणा केली आहे. एसबीआयने गृहकर्ज व्याजदरांमध्ये देखील कपात केली आहे. या कपातीनंतर व्याजदर 7.40 टक्क्यांवरून 7.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. हे नवीन दर 10 मे पासून लागू होणार आहेत. बँकेकडून करण्यात आलेली ही एमसीएलआरमधील बारावी कपात आहे तर आर्थिक वर्ष 2020-21 मधील दुसरी. याआधी बँकेने व्याजदरात 0.35 टक्क्यांनी कपात केली होती. या निर्णयामुळे MCLR आधरित होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळेल. जर एखाद्या व्यक्तीने 30 वर्षांसाठी एसबीआयकडून 25 लाखांचे MCLR आधरित कर्ज घेतले आहे तर या निर्णयामुळे त्या व्यक्तीच्या ईएमआयमधून दरमहा 255 रुपये वाचतील. (हे वाचा-कोरोनामुळे ATMमधून पैसे काढायला भीती वाटतेय?आता शेजारच्या दुकानातूनही मिळेल रोकड) संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: SBI, Sbi fd interest rates, Sbi fd rates

    पुढील बातम्या