Home /News /money /

कोरोनामुळे ATMमधून पैसे काढायला भीती वाटतेय?आता शेजारच्या दुकानातून काढू शकता रोख रक्कम

कोरोनामुळे ATMमधून पैसे काढायला भीती वाटतेय?आता शेजारच्या दुकानातून काढू शकता रोख रक्कम

नवी दिल्ली, 04 ऑगस्ट : तुम्ही ATM चा वापर फक्त शॉपिंग किंवा पैसे काढण्यासाठी केला असेल. मात्र जर तुमच्याकडे RuPay चे एटीएम कार्ड असेल तर ही आनंदाची बाब आहे. संकटकाळात हे कार्ड तुमच्या उपयोगात येईल.

नवी दिल्ली, 04 ऑगस्ट : तुम्ही ATM चा वापर फक्त शॉपिंग किंवा पैसे काढण्यासाठी केला असेल. मात्र जर तुमच्याकडे RuPay चे एटीएम कार्ड असेल तर ही आनंदाची बाब आहे. संकटकाळात हे कार्ड तुमच्या उपयोगात येईल.

कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे अनेकजण एटीएममधून पैसे काढण्याचे टाळत आहेत. तुम्हाला देखील अशी भीती वाटत असेल तर एटीएम न वापरता पैसे काढण्याची आणखी एक पद्धत आहे. वाचा कशाप्रकारे ही रक्कम तुम्ही काढू शकाल.

    नवी दिल्ली, 07 मे : कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची भीती असल्याने अनेकजण एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्यास घाबरत आहे. तुम्हाला सुद्धा ही भीती असेल तर आम्ही एक पर्याय सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही एटीएमचा वापर केल्याशिवार पैसे काढू शकता. पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशीन्स असणाऱ्या दुकानांच्या माध्यमातून तुमचे हे काम पूर्ण होऊ शकते. पीओएस टर्मिनलवरून पैसे काढण्यासंदर्भात आरबीआयला विचारण्यात येणाऱ्या FAQs (Frequently Asked Questions)ची एक यादी आरबीआयने (RBI) ने प्रसिद्ध केली आहे. 1. पीओएस टर्मिनल वापरून पैसे काढण्यासाठी कोणत्या कार्ड्सचा वापर करावा लागेल? या सुविधेअंतर्गत ग्राहक त्यांच्या डेबिट कार्डचा वापर करून पैसे काढू शकतात. बँकांनी जारी केलेल्या ओपन सिस्‍टम प्रीपेड कार्डांच्या माध्यमातून देखील पैसे काढू शकतात. दरम्यान या सुविधेअंतर्गत क्रेडिट कार्डचा वापर नाही करू शकत. (हे वाचा-तब्बल 40 दिवसानंतर Maruti Suzuki ने विकल्या 50 गाड्या, 25 मार्चपासून होती विक्री) युपीआयच्या माध्यमातून सुद्धा पीओएस टर्मिनलमधून पैसे काढता येतील. त्याचप्रमाणे यामध्ये पंतप्रधान जनधन खात्यांमध्ये देण्यात आलेल्या ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीशी लिंक असणाऱ्या इलेक्‍ट्रॉनिक कार्ड्सचा देखील वापर करता येईल. 2. या सुविधेसाठी शूल्क काय आहे? या ट्रान्झाक्शनसाठी लागणारे शूल्क तुम्ही काढणार असणाऱ्या रकमेच्या 1 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल. 3. दुसऱ्या बँकाच्या पीओएस टर्मिनलमधून पैसे काढता येतील? होय. या गोष्टीचा फरक नाही पडत की तुमच्याकडे कोणत्या बँकेचे कार्ड आहे. 4. या सुविधेअंतर्गत पैसे काढण्याची काही मर्यादा आहे का? होय. या सुविधेअंतर्गत टियर 3 ते 6 पर्यंतच्या शहरांमध्ये एका कार्डमधून 2000 रुपये पर्यंतची रक्कम काढता येईल. तर टियर 1 आणि 2 च्या शहरांमध्ये एका कार्डमधून पैसे काढण्याची मर्यादा 1000 रुपये आहे. 5. यातून कोणती पावती मिळेल का? हो. दुकानदार तुम्हाला पीओएस टर्मिनलमधून जनरेट झालेली पावती तुम्हाला देतील. 6. ही सुविधा सुद्धा मर्चेंट एस्‍टॅबलिशमेंटमध्ये मिळते का? मला कसे कळेल की कोणत्या दुकानदाराकडे ही सुविधा उपलब्ध आहे? पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे नाही. सर्व मर्चेंट एस्‍टॅबलिशमेंटमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही आहे. ही सुविधा केवळ त्या दुकानदारांकडे उपलब्ध आहे, ज्यांना बँकांनी परवानगी दिली आहे. दुकानदारांना या सुविधेविषयी ग्राहकांना स्पष्ट माहिती द्यावी लागेल. काही शुल्क असेल तर त्याबाबतही माहिती देणे आवश्यक आहे. 7. बँकांनी ही सुविधा देण्यासाठी आरबीआयची परवानगी आवश्यक आहे का? नाही. स्थानिक क्षेत्रीय बँका सोडल्यास ज्या बँकांना पीओएस टर्मिनल लावायचे आहे ते त्यांच्या बोर्डाची परवानगी घेऊन या सुविधेच्या माध्यमातून पैसे काढण्याची परवानगी देऊ शकतात. स्थानिक क्षेत्रीय बँकाना आरबीआयची परवानगी आवश्यक आहे. 8. या सुविधेबाबत आणखी माहिती कुठून मिळेल? आरबीआयने जारी केलेल्या खलील सर्क्यूलरमधून याबाबत माहिती मिळेल- DPSS.CO.PD.No.147/02.14.003/2009-10 dated July 22, 2009, DPSS.CO.PD.No.563/02.14.003/2013-14 dated September 5, 2013, DPSS.CO.PD.No.449/02.14.003/2015-16 dated August 27, 2015, DPSS.CO.PD.No.501/02.14.003/2019-20 dated August 29, 2019 आणि DPSS.CO.PD.No.1465/02.14.003/2019-20 dated January 31, 2020 9. या सुविधेचा लाभ घेतना संबधित दुकानातून वस्तू किंवा सामान खरेदी करणे अनिवार्य आहे का? नाही. 10. या सुविधेविषयी तक्रार कुठे करू शकतो? कार्ड जारी करणाऱ्या बँकेकडे तुम्ही तक्रार करू शकता. त्याठिकाणाहून योग्य उत्तर आणि वेळेत उत्तर न आल्यास Banking Ombudsman Scheme अंतर्गत तक्रार करता येईल. (हे वाचा-लॉकडाऊनमध्ये SBI अलर्ट!बनावट बँक अधिकाऱ्यापासून सावधान,खातं रिकामं होण्याचं संकट) संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या