नवी दिल्ली, 15 एप्रिल: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा ‘अमृत कलश’ सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज दिले जातेय. बँकेने ही विशेष एफडी योजना 15 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू केली. कारण ही 31 मार्च 2023 पर्यंतच सुरु राहणार होती. ही 400 दिवसांची FD आहे. अमृत कलश डिपॉझिटमध्ये प्रीमेच्योर आणि लोन सुविधा देखील उपलब्ध आहे. या योजनेविषयी आता सविस्तर जाणून घेऊया…
बँकेने 400 दिवसांच्या विशेष कालावधीसह अमृत कलश डिपॉझिट स्किम सुरु केलीये. या योजनेचा कालावधी 12 एप्रिल 2023 ते 30-जून-2023 पर्यंत असेल. सर्वसामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांना एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी दिली जातेय. दोन्ही श्रेणींसाठी व्याजदर स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आले आहेत.
जगातील सर्वात महागडी कॉलोनी! एका बंगल्याची किंमत ऐकून चक्रावून जालकिती आहे परतावा?
सामान्य व्यक्तींसाठी व्याज दर 7.10 टक्के आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.60 टक्के व्याजदर आहे. हा व्याजदर बँकेच्या विशेष व्ही-केअर योजनेपेक्षा जास्त आहे. SBI We-care फिक्स्ड डिपॉझिटचा कार्यकाळ 5-10 वर्षे आहे. यामध्ये व्यक्तीसाठी 6.50 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के व्याजदर आहे. या योजनेवरील व्याज मासिक, त्रैमासिक आणि सहामाही अंतराने दिले जाईल. टीडीएस कापल्यानंतर स्पेशल एफडी स्कीमवरील मॅच्युरिटी व्याज ग्राहकाच्या खात्यात जोडले जाईल. अमृत कलश डिपॉझिटमध्ये प्रीमेच्योर आणि लोन सुविधेचा देखील समावेश आहे.
कर्जदारांनो लक्ष द्या! आरबीआयने बदलाला EMI संदर्भातील मोठा नियम, आता…SBI WeCare ज्येष्ठ नागरिक FD स्किम
यासोबतच SBI ने आपली WeCare ज्येष्ठ नागरिक FD योजना 30 जून 2023 पर्यंत वाढवली आहे. मे 2020 मध्ये पहिल्यांदा ही योजना सुरु करण्यात आली. तेव्हा याची मुदत ही सप्टेंबर 2020 पर्यंत होती. तेव्हापासून आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या या एफडी योजनेला वारंवार मुदतवाढ देण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांसाठी या विशेष योजनेअंतर्गत 5 वर्षे ते 10 वर्षे कालावधीसाठी 7.50 टक्के व्याजदर दिला जातो.