जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कर्जदारांनो लक्ष द्या! आरबीआयने बदलाला EMI संदर्भातील मोठा नियम, आता...

कर्जदारांनो लक्ष द्या! आरबीआयने बदलाला EMI संदर्भातील मोठा नियम, आता...

आरबीआय नियम

आरबीआय नियम

Penalty charges news: तुम्ही कर्ज घेतले असेल किंवा ते घेण्याची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Penalty charges news: आरबीआयने कर्जदारांना दिलासा देत मोठे पाऊल उचलले आहे. कर्जाशी संबंधित बाबींमध्ये ग्राहकांना अधिक ट्रान्सपरेंसी देण्यासाठी, आरबीआयने दंडात्मक चार्जेसविषयी नवीन नियमांचा मसुदा तयार केलाय. अनेक नियमन केलेल्या संस्था कर्जामध्ये चूक झाल्यास किंवा नियमांचे पालन न केल्यास लागू दरांसोबतच दंडात्मक शुल्क आकारतात. जे चक्रवृद्धी असते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, बँका लोन न फेडल्यास किंवा उशीर झाल्यास तगडे व्याज वसूल करतात. ते देखील कंपाउंडिंग व्याजासकट वसूल करतात. यामध्ये रेग्युलेटेड संस्थांमध्ये बँक, गैर-बँकिंग वित्तीय कंपन्या आणि हाउसिंग फायनेंस कंपण्यांचा समावेश आहे.

News18लोकमत
News18लोकमत

सेबी रजिस्टर्ड इन्वेस्टमेंट अॅडव्हायजर आणि Stable Investor चे फाउंडर देव आशीष सांगतात की, नवीन नियमांचा कर्जदारांना खूप फायदा होईल. कारण अनेक बँका आता परतफेडीला विलंब झाल्यास दंडात्मक शुल्काऐवजी दंडात्मक व्याज आकारणार आहेत.

काय आहेत नवीन नियम

-आरबीआयच्या मसुद्यात वित्तीय कंपन्या आणि बँकांकडून आकारण्यात येणारे दंडात्मक शुल्क, लेट पेमेंटवरील व्याजदर, भरघोस दंड आकारण्याच्या अटी आणि शर्ती, नियामक आदेशांनुसार व्याजदरात सुधारणा आणि बरेच काही समाविष्ट आहे. -15 मे पर्यंत, RBI ने बँका, NBFC आणि हाउसिंग फायनेंस कंपन्यांकडून (HFCs) या मसुद्यावर त्यांचे मत देण्यास सांगितले आहे.

Investment Tips : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्किमने वाढवलं व्याज! FD पेक्षा जास्त रिटर्न मिळेल का?

पेनल्टी चार्जेसमध्ये काय बदल होईल

-नव्या मसुद्यात आरबीआयचा फोकस पॅनल्टी चार्जेसवर जास्त राहिलाय. यासोबतच आरबीआयच्या लक्षात आले आहे की, बँकांना दंड आकारण्यासाठी दिलेले स्वातंत्र्य महसूल वाढवण्यासाठी वापरले जात आहे. -कर्जदारांकडून परतफेड करण्यात चूक झाल्यास, बँका दंड आकारण्याऐवजी दंड व्याज आकारतात, जे चक्रवाढ होते. व्याजाच्या स्वरूपात दंड आकारला जाऊ नये, असे आरबीआयचे म्हणणे आहे.

ATM मधून एका दिवसात किती काढता येतात पैसे? तुम्हाला माहितीय का हा नियम?

-आरबीआयने सांगितले की दंडाचा उद्देश कर्जदारांमध्ये क्रेडिट शिस्तीची भावना निर्माण करणे हा आहे. या दंडाच्या मदतीने रेव्हेन्यू वाढवणे हा उद्देश नाही. दंडात्मक शुल्काबाबत ग्राहकांकडून अनेक तक्रारी आल्या आहेत. या व्यतिरिक्त बँका आणि ग्राहकांमध्ये वादही झाले आहेत. -हा दंड ‘दंड व्याज’ म्हणून लागू केला जाणार नाही, अशीही तरतूद मसुद्यात करण्यात आली आहे. सध्या दंड व्याजात बँका चक्रवाढ व्याजानुसार दंड आकारतात. -मसुद्यातील आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अटी व शर्ती विभागात दंड आकारणीचा स्पष्ट उल्लेख करावा लागेल. सध्या, बहुतेक कर्जदारांना दंड व्याज कसे मोजले जाते याबद्दल माहिती नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: EMI , loan
  • First Published :
जाहिरात
जाहिरात