SBI ने तब्बल 76 हजार 600 कोटींचं कर्ज टाकलं बुडित खात्यात, 220 जण दिवाळखोरीत

स्टेट बँक ऑफ इंडिया ने दिवाळखोरीत गेलेल्या 220 जणांचं कर्ज बुडित खात्यात टाकलं आहे. हे एकूण कर्ज 76 हजार 600 कोटींचं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2019 08:21 PM IST

SBI ने तब्बल 76 हजार 600 कोटींचं कर्ज टाकलं बुडित खात्यात, 220 जण दिवाळखोरीत

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : स्टेट बँक ऑफ इंडिया ने दिवाळखोरीत गेलेल्या 220 जणांचं कर्ज बुडित खात्यात टाकलं आहे. हे एकूण कर्ज 76 हजार 600 कोटींचं आहे. तांत्रिकदृष्ट्या हे कर्ज राइट ऑफ म्हणजे निर्लेखित करण्यात आलं आहे. CNN News 18 ने रिझर्व्ह बँकेत दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जातून ही माहिती मिळाली.

यामध्ये बँकांची 31 मार्च 2019 पर्यंतची 100 कोटींपासून ते 500 कोटीपर्यंतचं कर्ज बुडित खात्यात टाकली आहेत. या दिवाळखोरीत निघालेल्या कर्जदारांमध्ये SBI आणि पंजाब नॅशनल बँकेचे कर्जदार मोठ्या संख्येने आहेत. याच पंजाब नॅशनल बँकेत आर्थिक गैरव्यवहार पुढे आलेले आहेत. IDBI या बँकेनेही कर्जदारांची कर्जं बुडित खात्यात घातली आहेत. त्याचबरोबर या यादीत कॅनरा बँकेचे कर्जदारही आहेत.

खाजगी बँकांचाही समावेश

खाजगी बँकांबद्दल बोलायचं तर अॅक्सिस बँकेच्या 43 कर्जदारांनी दिवाळखोरी घोषित केली आहे. ICICI बँकेच्या 37 कर्जदारांची खातीही बुडित खात्यात टाकण्यात आली. सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक या बँकांमध्ये प्रत्येकी 4 दिवाळखोर आहेत.

(हेही वाचा : 'आमचे पैसे परत द्या', PMC बँकेच्या खातेदारांचा निर्मला सीतारामन यांना घेराव)

Loading...

रिझर्व्ह बँकेने 980 कर्जदारांची यादी काढली आहे. दिवाळखोरी घोषित केलेल्यांमध्ये 500 कोटी रुपये आणि त्याहीपेक्षा जास्त कर्ज असलेल्या कर्जदारांचा समावेश आहे.एककीडे पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांनी त्यांचे पैसे मिळावे या मागणीसाठी निदर्शनं सुरू ठेवली आहेत तर दुसरीकडे एवढ्या कर्जदारांची कर्ज बुडित खात्यात टाकण्यात आली.

==============================================================================================

VIDEO : अमित शहांच्या भाषणादरम्यान 'सीएम सीएम' घोषणाबद्दल पंकजा मुंडे म्हणाल्या....

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: rbiSBI
First Published: Oct 10, 2019 08:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...