'आमचे पैसे परत द्या', PMC बँकेच्या खातेदारांचा निर्मला सीतारामन यांना घेराव

'आमचे पैसे परत द्या', PMC बँकेच्या खातेदारांचा निर्मला सीतारामन यांना घेराव

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक गोत्यात आल्यामुळे चिडलेल्या खातेदारांनी आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेआधी त्यांना घेराव घातला. यानंतर निर्मला सीतारामन यांनी त्यांच्यासोबत बैठक घेतली.

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर : पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक गोत्यात आल्यामुळे चिडलेल्या खातेदारांनी आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेआधी त्यांना घेराव घातला आणि निदर्शनं केली. यावर निर्मला सीतारामन यांनी त्यांच्यासोबत बैठक घेतली.

PMC बँकेच्या खातेदारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांच्याशी गव्हर्नरशी चर्चा करू, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. सहकारी बँकांची रचना ठरवण्यासाठी एक गट स्थापन करण्यात येणार आहे. हा गट सहकारी बँकांमधल्या सुधारणा सुचवणार आहे.

सहकारी बँकांवर नियंत्रक नेमण्यावर विचार होणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात याबदद्लचं विधेयक आणलं जाईल आणि गरज असेल तर कायद्यात बदल केला जाईल, असं त्या म्हणाल्या.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांच्यासोबत आज संध्याकाळी बैठक होईल, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

(हेही वाचा : SBI मध्ये मुलीच्या नावाने उघडा खातं, मोदी सरकारची विशेष योजना)

याआधी, PMC बँकेच्या खातेधारकांनी भाजपच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं केली. निर्मला सीतारामन जेव्हा मुंबईतल्या नरिमन पॉइंटच्या कार्यालयात आल्या तेव्हा या खातेधारकांनी त्यांची वाट अडवत गोंधळ घातला.

काहीही करून आमच्या बँक खात्यातली रक्कम आम्हाला परत द्या, अशी मागणी त्यांनी केली. रिझर्व बँक किंवा कोर्ट काय करणार याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही, असं या खातेदारांचं म्हणणं होतं.

==========================================================================================

VIDEO: खासदार नवनीत राणा यांनी देवीला काय घातलं साकड?

Published by: Arti Kulkarni
First published: October 10, 2019, 3:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading