बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये FD केली आहे? 3 दिवसात हा फॉर्म जमा न केल्यास होणार मोठे नुकसान

बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये FD केली आहे? 3 दिवसात हा फॉर्म जमा न केल्यास होणार मोठे नुकसान

तुम्ही देशातील कोणत्याही सरकारी, खाजगी बँकेत (SBI, PNB ICICI Bank, Axis Bank) किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एफडी काढली आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण एक 'हा' महत्त्वाचा फॉर्म न भरल्यास तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जाईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 जुलै : बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही एफडी (FD Fixed Deposit) केली असेल तर तुम्हाला 15G आणि 15H फॉर्म जमा (TDS) करणे अनिवार्य आहे. नाहीतर तुम्हाला व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नातून टीडीएस कापून घेतला जाईल. या फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख 7 जुलै आहे. हे दोन्ही फॉर्म करापासून वाचण्यासाठी असे करदाता भरतात जे टॅक्स स्लॅबमध्ये येत नाहीत. केंद्र सरकारने लॉकडाऊनमुळे लोकांसमोर निर्माण झालेल्या विविध समस्यां लक्षात घेता बँकेच्या ठेवीदारांना देखील दिलासा दिला आहे. ठेवीदारांना एफडीवर देय व्याजदरावरील टीडीएसवर सूट मिळावी याकरता 15जी फॉर्म आणि 15एच फॉर्म भरावा लागतो. आयकर विभागाने हा फॉर्म भरण्याची तारीख 7 जुलै पर्यंत वाढवली आहे. जर ठेवीदारांनी हा फॉर्म नाही भरला तर बँकेकडून व्याजाच्या रकमेवर 10 टक्के टीडीएस कापण्यात येतो.

फॉर्म भरणे आवश्यक का आहे?

आर्थिक वर्षामध्ये एफडीवरील व्याजामुळे मिळणारे उत्पन्न एक निश्चित सीमा पार करते, त्यावेळी बँकांना टीडीएस करणे अनिवार्य असते. त्यामुळे ठेवीदारांनी 15जी फॉर्म आणि 15एच फॉर्म (वरिष्ठ नागरिकांसाठी) एक प्रकारे स्वघोषणा पत्र असते आणि त्यात असे भरावे लागते की त्यांचे उत्पन्न करयोग्य सीमेपेक्षा कमी आहे.

(हे वाचा-Intel-Jio Deal: रिलायन्स JIO मध्ये इंटेलची 1,894.5 कोटी गुंतवणूक, काय आहे फायदा)

या खातेधारकांच्या उत्पन्नावर टीडीएस नाही कापता येणार हे सुनिश्तित करण्यासाठी  15जी फॉर्म आणि 15एच फॉर्म (वरिष्ठ नागरिकांसाठी) भरणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही व्याजावरील टीडीएसपासून वाचू शकता. हा फॉार्म बँका, कॉर्पोरेट बाँड जारी करणाऱ्या कंपन्या, पोस्ट ऑफिस इ. मध्ये द्यावा लागतो.

हा फॉर्म कोण-कोण जमा करू शकतो?

फॉर्म 15G चा वापर 60 वर्षापेक्षा कमी वय असणारा भारतीय नागरिक, हिंदू अविभाजित परिवार म्हणजेच HUF किंवा ट्रस्ट करू शकतात. तर फॉर्म 15H ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी असतो. या फॉर्म्सची वैधता केवळ 1 वर्ष असते. त्यामुळे प्रत्येक वर्षी ते जमा करणे आवश्यक असते.

जर कर कापला गेला तर कसे मिळवाल पैसे परत?

फॉर्म 15G आणि फॉर्म 15H भरण्यास उशीर झाल्यामुळे टीडीएस कापला गेल्यास, त्याचा रिफंड केवळ इनकम टॅक्स रिफंड फाइल करूनच मिळवू शकता.

SBI मध्ये एफडी असणारे घरबसल्या हा फॉर्म कसा जमा करू शकतात?

ग्राहकांना ई-सेवा, 15G/H हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर 15एच किंवा 15जी पैकी तुमचा फॉर्म निवडा. त्यानंतर Customer Information File (CIF) No वर क्लिक करून सबमिट करा.

(हे वाचा-मोदी सरकारच्या या योजनेमुळे 20.41 लाख जणांना मिळणार वार्षिक 36 हजार रुपये)

सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एका पेजवर रिडायरेक्ट केले जाईल. ज्याठिकाणी काही माहिती अगोदरच भरलेली असेल. त्यानंतर अन्य माहिती भरा.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: July 4, 2020, 8:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading