Home /News /money /

Intel-Jio Deal: रिलायन्स JIO मध्ये इंटेल करणार 1,894.5 कोटींची गुंतवणूक, काय होणार फायदा

Intel-Jio Deal: रिलायन्स JIO मध्ये इंटेल करणार 1,894.5 कोटींची गुंतवणूक, काय होणार फायदा

रिलायन्स समुहाने (Reliance Industries Limited RIL) शुक्रवारी अशी घोषणा केली की, इंटेल ही कंपनी (Intel) रिलायन्सची टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्मध्ये (Jio Platform) 0.39 टक्के भागीदारीसाठी 1894.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

    मुंबई, 03 जुलै : रिलायन्स समुहाने (Reliance Industries Limited RIL) शुक्रवारी अशी घोषणा केली की, इंटेल ही कंपनी (Intel) रिलायन्सची टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्मध्ये (Jio Platform) 0.39 टक्के भागीदारीसाठी 1894.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गेल्या अकरा आठवड्यामध्ये जिओमध्ये होणारी ही बारावी मोठी आणि ऐतिहासिक गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीनंतर जिओमध्ये करण्यात आलेली एकूण गुंतवणूक 1,17,588.45 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान जिओमध्ये आतापर्यंत फेसबुक, सिल्व्हर लेक पार्टनर्स (दोन गुंतवणूक), विस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलँटिक, केकेआर, मुबादला, एडीआयए, टीपीजी, एल कॅटेरटॉन, पीआयएफ आणि आता इंटेल या जगभरात तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. जगभरात पहिल्यांदाच सलग एवढ्या मोठ्या प्रमाणात फंड्स निर्माण करण्यात आले आहेत. जिओ प्लॅटफॉर्म अंतर्गत मुव्ही, न्यूज आणि म्युझिक App शिवाय टेलिकॉम कंपनी येते. जिओ प्लॅटफॉर्म जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांना गुंतवणूक करण्यामध्ये यशस्वी झाला आहे. जिओमध्ये गुंतवणूकीची सुरूवात फेसबुक या कंपनीपासून झाली. फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्मवर 9.99 टक्के भागीदारी खरेदी करत 43,574 कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यानंतर सिल्व्हर लेक पार्टनर्स (दोन गुंतवणूक), विस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलँटिक, केकेआर, मुबादला, एडीआयए, टीपीजी, एल कॅटेरटॉन, पीआयएफ आणि आता इंटेल यांनी जिओमध्ये मोठी गुंतवणूक केली. हे वाचा - मोदी सरकारच्या या योजनेमुळे 20.41 लाख जणांना मिळणार वार्षिक 36 हजार रुपये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी म्हणाले, "आम्हाला हा करार करताना खूप आनंद होत आहे. भारताला जगातील सर्वोच्च डिजीटल सोसायटी बनवण्याचं आमचं लक्ष्य आहे. इंटेल या क्षेत्रात खरा लीडर आहे, जगातील बदलत्या आणि नव्या टेक्नॉलॉजीनुसार काम करणारं आहे. जगातील टेक्नॉलीजी कंपनीमध्ये इंटेल कॅपिलटल हे पुढे आहे" इंटेल कॅपिटल ही इंटेल कॉर्पोरेशनची (Intel Corporation) गुंतवणूक शाखा आहे. इंटेल सेमीकंडक्टर उद्योगातील अग्रगण्य कंपनी आहे, जे संगणकीय आणि संप्रेषण तंत्रज्ञानासह जागतिक परिवर्तनांचा पाया आहे.गेल्या दोन दशकांपासून इंटेल भारतामध्ये कार्यरत आहे.  बंगळुरू आणि हैदराबाद याठिकाणी इंटेलमधये हजारो कर्मचारी काम करत आहेत. इंटेल कॅपिटलचे प्रेसिडंट वेंडेल ब्रुक्स म्हणाले, "जिओ प्लॅटफॉर्म हे भारतात कमीत कमी किमतीत डिजीटल सेवा देण्यावर भर देतं. आम्ही एकत्रितरित्या डिजीटल एक्सेस आणि डाटा यावर काम करू आणि बिझनेस आणि सोसायटीमध्ये चांगले बदल करू. या गुंतवणुकीतून भारतातील डिजीटल ट्रान्सफॉर्मेशनला हातभार लावण्यात आम्ही उत्सुक आहोत" इंटेल कॅपिटल आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, स्वायत्त वाहने, डेटासेंटर आणि क्लाऊड, 5 जी, नेक्स्ट जनरेशन कॉम्प्यूटर आणि इतर तंत्रज्ञान असणाऱ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करते. 1991 पासून, इंटेल कॅपिटलने जगभरातील 1582 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये 12.9 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड
    First published:

    Tags: Reliance Jio

    पुढील बातम्या