खूशखबर! 20.41 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी जमा होणार 36 हजार, वाचा काय आहे मोदी सरकराची योजना

खूशखबर! 20.41 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी जमा होणार 36 हजार, वाचा काय आहे मोदी सरकराची योजना

मोदी सरकार (Modi Government) देशातील 20 लाख 41 हजार शेतकऱ्यांना वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन देणार आहे. पीएम शेतकरी मानधन योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 जुलै : मोदी सरकार (Modi Government) देशातील 20 लाख 41 हजार शेतकऱ्यांना वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन देणार आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी असणारी पहिली पेन्शन योजना अर्थात पीएम शेतकरी मानधन योजनेअंतर्गत  (Pradhan Mantri Kisan Maandhan yojana) 20 लाख 41 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 6 लाख 38 हजारांपेक्षा जास्त महिला आहेत. ही योजना त्या शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे, ज्यांचा उदरनिर्वाह केवळ शेतीवर अवलंबून आहे.

या योजनेकरता सर्वाधिक सव्वाचार लाख शेतकऱ्यांची नोंदणी हरियाणा राज्यातून करण्यात आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बिहारमधून 3 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर झारखंड-उत्तरप्रदेशमधील जवळपास अडीच-अडीच लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 26 ते 35 वर्ष वय असणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिक रुची दाखवली आहे.

किती खर्च करावा लागेल?

-पीएम शेतकरी मानधन योजना 18 ते 40 वयवर्ष असणाऱ्या लघु आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आहे. पाच एकर अर्थात 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असणे आवश्यक आहे

(हे वाचा-Intel-Jio Deal: रिलायन्स JIO मध्ये इंटेल करणार 1,894.5 कोटींची गुंतवणूक)

-या योजनेअंतर्गत कमीत कमी 20 वर्षापर्यंत आणि जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत 55 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत दर महिन्याला योगदान द्यावे लागेल, जे शेतकऱ्याच्या वयावर अवलंबून असेल.

-जर या योजनेअंतर्गत तुम्ही 18 वर्षांचे असताना जोडले गेलात तर 55 रुपये महिना म्हणजेच 660 रुपये वार्षिक द्यावे लागतील. जर 40 वर्षांचे असताना या योजनेत जोडले गेलात तर महिन्याला 200 म्हणजेच वार्षित 2400 रुपये द्यावे लागतील.

कशी कराल नोंदणी?

-या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कॉमन सर्विस सेंटर (CSC)वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल

-नोंदणीकरता आधार कार्ड, 2 फोटो आणि बँक  पासबुक (Bank Passbook)ची प्रत आवश्यक आहे.

(हे वाचा-नोकरी जाण्याची भीती असल्यास सुरू करा हा व्यवसाय, करू शकता लाखोंची कमाई)

-रजिस्ट्रेशन साठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. नोंदणीनंतर शेतकऱ्याचा पेन्शन युनिक नंबर आणि पेन्शन कार्ड बनवण्यात येईल.

पेन्शनसाठी आहेत या अटी

-नॅशनल पेन्शन स्कीम, कर्मचारी राज्य वीमा निगम (ESIC) स्कीम आणि कर्मचारी भविष्य निधि (EPFO) योजनेअंतर्गत येणारे लोक या योजनेसाठी पात्र नसतील.

-वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना महिना 3000 रुपये पेन्शन मिळू लागेल. पॉलिसी होल्डर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला 50 टक्के रक्कम मिळत राहील

-जर एखादा शेतकरी ही योजना मध्येच सोडू इच्छित असेल तर त्याचे पैस बुडणार नाहीत. त्याने योजना सोडपर्यंत जे पैसे जमा केले आहेत त्यावर बँकांच्या बचत खात्याच्या समान व्याज मिळेल.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: July 3, 2020, 1:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading