नवी दिल्ली, 19 जून : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गुरुवारी स्टेट बँकेने ट्विटरवरून अशी माहिती दिली की, 21 जून 2020 रोजी त्यांची ऑनलाइन सर्व्हिस बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही कोणत्या ऑनलाइन ट्रान्सॅक्शन करण्याच्या विचारात असाल, तर याच हिशोबाने तुमचा प्लॅन आखा. काही दिवसांपासून एसबीआय ग्राहकांना ऑनलाइन ट्रान्सॅक्शनमध्ये समस्या येत होती. गुरुवारी SBI ने त्यांच्या ट्वीटमध्ये असं लिहिलं आहे की, बँकेच्या काही अॅप्लिकेशन्ससाठी आम्ही काही नवीन प्रणाली लागू करत आहोत. परिणामी 21 जून रोजी आमच्या ऑनलाइन सुविधा बंद राहू शकतात. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी त्यानुसार प्लॅन आखावा'.
Our online services may not be accessible on 21st June as we will be deploying a new environment for some of our applications. We request our customers to plan accordingly to avoid being inconvenienced. #ImportantNotice #SBI pic.twitter.com/nKQBuaZYgt
— State Bank of India (@TheOfficialSBI) June 18, 2020
वाचा-LIC ची खास पॉलिसी! एकदा गुंतवणूक करून मिळेल 65 हजारांची पेन्शन, वाचा सविस्तर
13 आणि 14 जून रोजी एसबीआयची ऑनलाइन सुविधा व्यवस्थित काम करत नव्हती. काही ग्राहकांनी यासंदर्भात तक्रार देखील दाखल केली होती. ग्राहकांनी ट्विटरवरून तक्रारी केल्यानंतर एसबीआयने त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून अनेक ग्राहकांना रिप्लाय देखील केले होते. त्यावेळी ही समस्या लवकरच सोडवण्यात येईल असं आश्वासन एसबीआयकडून देण्यात आले होते.
वाचा-पोस्टाच्या या योजनेत बँकेच्या FDपेक्षा लवकर दुप्पट होतील पैसे
यावेळी एसबीआयच्या एका ग्राहकाने तक्रार केली होती की 13 जून सकाळपासूनच एसबीआयची ऑनलाइन सेवा ठप्प होती. बँकेचे व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करण्यास त्यावेळी समस्या उद्भवत होत्या. काही ग्राहकांनी अशी तक्रार केली की पेटीएम, यूपीआय, योनो एसबीआय App,इंटरनेट बँकिंग या माध्यमातून व्यवहार करता येत नाही आहे, इतकच नव्हे तर खात्यातील रक्कम देखील ऑनलाइन चेक करता येत नव्हती. काही वेळानंतर एसबीआयने त्यांची सेवा पूर्ववत झाल्याची माहिती दिली. SBI Internet Banking ही सेवा सुरू झाली असली तरी YONO SBI App ही सेवा अद्याप डाऊन आहे. ही सेवा लवकर सुरू होईल अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.
वाचा-पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची,रोज 100 रुपयांची गुंतवणूक करून कमवा 5 लाख रुपये
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SBI, Sbi account