मराठी बातम्या /बातम्या /मनी /पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची, रोज 100 रुपयांची गुंतवणूक करून कमवा 5 लाख रुपये

पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची, रोज 100 रुपयांची गुंतवणूक करून कमवा 5 लाख रुपये

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit RD) अकाउंट छोटे हप्ते असणारी, चांगला व्याजदर असणारी आणि सरकारी गॅरंटीची योजना आहे.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit RD) अकाउंट छोटे हप्ते असणारी, चांगला व्याजदर असणारी आणि सरकारी गॅरंटीची योजना आहे.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit RD) अकाउंट छोटे हप्ते असणारी, चांगला व्याजदर असणारी आणि सरकारी गॅरंटीची योजना आहे.

नवी दिल्ली, 17 जून : पोस्टाच्या अनेक योजना सामान्यांसाठी फायद्याच्या आहेत. यापैकी आरडीची योजना अनेकांच्या परिचयाची त्याचप्रमाणे विश्वासातील योजना आहे. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit RD) अकाउंट छोटे हप्ते असणारी, चांगला व्याजदर असणारी आणि सरकारी गॅरंटीची योजना आहे. गुंतवणुकदारांच्या मते ही योजना मार्केट लिंक्ड नसल्यामुळे खात्रीशीर रिटर्न देणारी ही योजना आहे. याठिकाणी आरडीमध्ये 5.8 टक्क्याने व्याज मिळते. पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिटचे खाते पाच वर्षांसाठी उघडण्यात येते. हा पर्याय देखील एफडी प्रमाणेच एक चांगला आर्थिक पर्याय आहे. मात्र याठिकाणी गुंतवणुक अधिक फायद्याची आहे. एफडीमध्ये तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागते. तर आरडीमध्ये तुम्हाला एसआयपी प्रमाणे वेगवेगळ्या इन्स्टॉलमेंटमध्ये महिन्याच्या महिन्याला गुंतवणूक करता येते. यामध्ये तुमच्या खात्यामध्ये व्याज तिमाही आधारावर कंपाउंडिंग होऊन जोडले जाते.

(हे वाचा-लॉकडाऊन काळात 'या' उद्योगपतीनं कमावले तब्बल 3 लाख कोटी, वाचा काय आहे कारण)

आरडीमध्ये व्याज कंपाउंडिंगच्या हिशोबाने जोडले जाते. याचा अर्थ असा की जेवढा जास्त टेन्योर असेल, त्याच हिशोबाने फायदा देखील वाढत जाईल. त्यामुळे आरडी करताना दीर्घकाळाचे लक्ष्य ठेवणे आवश्यक आहे. अनेक बँकांमध्ये मिळणारे व्याज कमी असून पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर मिळणारे व्याज 5.8 टक्के आहे. या आरडी योजनेमध्ये तुम्ही महिन्याला कमीत कमी 100 रुपयांची गुंतवणूक करू शकता. यापेक्षा जास्त तुम्ही 10 च्या पटीमध्ये कितीही रुपयांची मासिक गुंतवणूक करता येईल. जास्तीत जास्त रक्कम जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही आहे.

5 लाख फंड मिळवण्यासाठी काय कराल?

पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर जमा पैशांवर व्याज प्रत्येक तिमाहीला (वार्षिक दरानुसार) मोजले जाते. प्रत्येक तिमाही संपल्यावर ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाते. याचा अर्थ असा 5 लाखांचा फंड गोळा करण्यासाछी तुम्हाला 10 वर्षांसाठी दरमहा 3000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. 5.8 टक्के व्याजदर कायम राहील्यास हे शक्य आहे. यामध्ये एकूण 3.60 लाखाच्या गुंतवणुकीवर 1.40 लाख रुपयाची अधिक रक्कम मिळवता येईल.

(हे वाचा-सोने विकत घेणार आहात? खरेदीबाबतच्या या नियमात होऊ शकतो मोठा बदल)

एकाच व्यक्तीच्या नावावर कितीही आरडी काढता येतात. केवळ व्यक्तिगत स्वरूपातील खाते या गुंतवणुकीमध्ये सुरू करता येते. कुटुंब किंवा संस्थेच्या नावावर आरडी काढता येत नाही. दोन ज्येष्ठ नागरिक एकत्र जॉइंट आरडी देखील काढू शकतात.

संपादन - जान्हवी भाटकर

First published:
top videos

    Tags: Post office, Post office money