मराठी बातम्या /बातम्या /मनी /पोस्टाच्या या योजनेत बँकेच्या FDपेक्षा लवकर दुप्पट होतील पैसे, वाचा कशी कराल गुंतवणूक

पोस्टाच्या या योजनेत बँकेच्या FDपेक्षा लवकर दुप्पट होतील पैसे, वाचा कशी कराल गुंतवणूक

पोस्टाच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममधून बँकांच्या एफडीपेक्षा चांगला रिटर्न मिळत आहे. यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.

पोस्टाच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममधून बँकांच्या एफडीपेक्षा चांगला रिटर्न मिळत आहे. यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.

पोस्टाच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममधून बँकांच्या एफडीपेक्षा चांगला रिटर्न मिळत आहे. यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.

नवी दिल्ली, 18 जून : कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकाळात सामान्य नागरिकांना अनेक आर्थक संकटांचा सामना करावा लागला. या काळात जशी पैशांची चणचण भासली तशी परिस्थिती भविष्यात येऊ नये, याकरता छोट्या स्तरावर बचत करणे आवश्यक आहे. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या (Post Office) छोटी बचत योजना (Small Saving Scheme) एक चांगला पर्याय ठरू शकतो. सध्या बँकांच्या एफडी (Fixed Deposite) मधून मिळणाऱ्या व्याजाचा दरही कमी होत आहे. त्यामुळे पोस्टाच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममधून बँकांच्या एफडीपेक्षा चांगला रिटर्न मिळत आहे. यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्याचबरोबर यामध्ये जमा केल्या जाणाऱ्या पैशांवर सॉव्हरेन गॅरंटी देखील आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये टाइम डिपॉझिट खाते ही योजना छोट्या बचतीसाठी फायद्याची आहे. या खात्यामध्ये 1, 2, 3 आणि 5 वर्षासाठी पैसे जमा करता येतात. फायदा असा आहे की याठिकाणी बँकांच्या तुलनेमध्ये एफडीवरील व्याजदर 1.40 टक्क्यांनी जास्त आहे. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयमध्ये 5 वर्षाच्या एफडीवर 5.3 टक्के वार्षक व्याज आहे. तर पोस्टाच्या टाइम डिपॉझिट या योजनेचे वार्षिक व्याज 6.7 टक्के आहे. तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता.

वाचा-पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची,रोज 100 रुपयांची गुंतवणूक करून कमवा 5 लाख रुपये

टाइम डिपॉझिट खात्यासाठीचे व्याजदर

-या खात्यातील 1 वर्षाच्या एफडीसाठी 5.5 टक्के व्याज

-2 वर्षाच्या एफडीसाठी 5.5 टक्के व्याज

-3 वर्षाच्या एफडीसाठी 5.5 टक्के व्याज

-5 वर्षाच्या एफडीसाठी 6.7 टक्के व्याज

5 लाख जमा केल्यावर 5 वर्षात किती रक्कम मिळेल तर किती कालावधीत रक्कम दुप्पट होईल?

-जमा करण्यात येणारी रक्कम : 5 लाख

-व्याज दर : 6.7 टक्के वार्षिक

-मॅच्यूरिटी पीरियड : 5 वर्ष

-मॅच्यूरिटीनंतर मिळणारी रक्कम- 6,91500 रुपये

-व्याजाचा फायदा- 1,91,500 रुपये

-6.7 टक्के वार्षिक व्याजाच्या हिशोबाने पोस्ट ऑफिसमध्ये टाइम डिपॉझिट योजनेमध्ये जमा केलेली रक्कम दुप्पट होण्यासाठी साधारण 10.47 वर्ष म्हणजेच 129 महिने लागतील

वाचा-LIC ची खास पॉलिसी! एकदा गुंतवणूक करून मिळेल 65 हजारांची पेन्शन, वाचा सविस्तर

या योजनेची विशेषता

पोस्ट ऑफिसमध्ये टाइम डिपॉझिट ही योजना रोख रक्कम किंवा चेकच्या माध्यमातून काढता येते. इंडिया पोस्टच्या मते, चेकची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याच्या तारखेपासून तुमचे खाते सुरू होईल. या योजनेमध्ये कोणतीही व्यक्ती सिंगल खाते उघडू शकते, 3 प्रौढ व्यक्ती मिळून जॉईंट खाते देखील सुरू करू शकतात. तर 10 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलाच्या नावावर अभिभावक खाते उघडता येते. खाते काढण्यासाठी कमीत कमी रक्कम 1000 रुपये इतकी असून जास्तीत जास्त कितीही रकमेची गुंतवणूक तुम्ही करू शकता. 100 च्या पटीमध्ये जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करता येते. हे खाते सुरू करताना नॉमिनेशनचा पर्याय देखील उपलब्ध आहे. एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये खाते ट्रान्सफर देखील करता येते. मात्र प्रीमॅच्यूअर विथड्रॉल करायचे असेल तर दंड भरावा लागतो. टाइम डिपॉझिटवर जमा रकमेवर इनकम टॅक्स कायदा 1961 च्या सेक्शन 80 सी अंतर्गत करामध्ये सूट मिळते.

वाचा-लॉकडाऊन काळात 'या' उद्योगपतीनं कमावले तब्बल 3 लाख कोटी, वाचा काय आहे कारण

संपादन-जान्हवी भाटकर

First published:
top videos

    Tags: Post office, Post office bank, Post office facility, Post office money