नवी दिल्ली, 18 जून : लाईफ इन्शूरन्स कॉर्पोरेशन (LIC-Life Insurence Corporation) देशातील सर्वात अधिक विश्वासाची वीमा कंपनी आहे. एलआयसीच्या विविध पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर ग्राहकांना अनेक फायदे मिळतात. जीवन शांती स्कीम (Jeevan Shanti Scheme) ही योजना देखील पेन्शनसाठी एक विशेष योजना आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना भविष्यासाठी सुरक्षा प्रदान केली जाते.
काय आहे पॉलिसीची विशेषता?
एलआयसीने त्यांच्या अनेक पॉलिसी समाजातील प्रत्येक वर्गाचा विचार करता बनवल्या आहेत. एलआयसीकडून ग्राहकांना एंडोमेंट, टर्म, लाइफ इन्शूरन्स आणि पेन्शन अशा अनेक सुविधा पुरवल्या जातात. जीवन शांती योजनेअंतर्गत एकदाच हप्ता भरून आयुष्यभर पेन्शन मिळण्याची संधी आहे. या पॉलिसीमध्ये ग्राहकांकडे पेन्शनसंदर्भात दोन पर्याय असतात. एक म्हणजे इमिडिएट आणि दुसरा म्हणजे डेफ्फर्ड एन्यूटी. इमि़डिएटचा अर्थ असा होतो की पॉलिसी घेतल्यानंतर त्वरित पेन्शन मिळते तर डेफ्फर्ड एन्यूटीचा अर्थ असा होतो की पॉलिसी घेतल्यानंतर काही वर्षांनी (5, 10, 15, 20 वर्षानंतर) पेन्शन मिळू लागते. इमिडिएट एन्यूटीमध्ये 7 पर्याय आहेत. तर डेफ्फर्ड एन्यूटीमध्ये 2 पर्याय आहेत- 1. सिंगल लाइफसाठी डेफ्फर्ड एन्यूटी आणि 2. जॉइंट लाइफसाठी डेफ्फर्ड एन्यूटी.
वाचा-पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची,रोज 100 रुपयांची गुंतवणूक करून कमवा 5 लाख रुपये
जीवन शांती योजना ही सिंगल प्रिमियम योजना आहे. म्हणजेच यामध्ये एकदाच प्रिमियम भरावा लागतो. अधिकाधिक पेन्शनची यामध्ये कोणतीही मर्यादा नसते. या प्लॅनमध्ये 30 ते 85 वयोगटातील व्यक्तीच गुंतवणूक करू शकतात. तसंच या योजेनेत कमीतकमी 1.5 लाख ते जास्तीत जास्त कितीही रुपयांची गुंतवणूक करता येईल.
उदाहरणार्थ जर 50 वर्षाचा एखादा व्यक्ती पर्याय A अर्थात हर महिना पेन्शनचा पर्याय निवडतो आणि त्याबरोबर त्याने जर 10 वर्षासाठी एश्योर्ड हा पर्याय निवडला तर त्याला 10 लाख 18 हजार रुपयांचे प्रीमियम भरावा लागेल. या गुंतवणुकीनंतर त्याला प्रति महिना 5,617 रुपयांची पेन्शन मिळेल. पॉलिसीधारक जिवंत असेपर्यंत त्याला ही पेन्शन मिळेल. त्याच्या मृत्यूनंतर ही पेन्शन येणं बंद होईल.
या पॉलिसीमध्ये लोनची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे या पॉलिसीमध्ये 3 महिन्यानंतर कोणत्याही मेडिकल डॉक्यूमेंटशिवाय कधीही सरेंडर करता येईल.
वाचा-लॉकडाऊन काळात 'या' उद्योगपतीनं कमावले तब्बल 3 लाख कोटी, वाचा काय आहे कारण
वाचा सविस्तर
जर 50 वर्षाचा व्यक्ती 10,18,000 रुपये या पॉलिसीमध्ये गुंतवतो तर त्याला 65,600 रुपये वार्षिक पेन्शन मिळेल (इमिडिएट एन्यूटी) मात्र त्याने डेफ्फर्ड पर्याय स्वीकारल्यास या व्यक्तीला मिळणारी वार्षिक रक्कम भिन्न असेल-
1 वर्षानंतर - 69300 रुपये वार्षिक
5 वर्षानंतर- 91800 रुपये वार्षिक
10 वर्षानंतर - 128300 रुपये वार्षिक
15 वर्षानंतर - 169500 रुपये वार्षिक
20 वर्षानंतर - 192300 रुपये वार्षिक
ही पॉलिसी खरेदी करण्याचे फायदे
- ही पॉलिसी शेअर बाजाराशी लिंक्ड नाही आहे. एफडी दरांचा देखील यावर परिणाम होत नाही. जीवनभरासाठी तुमची एक निश्चित कमाई होते
- तुमचे आयुष्य जेवढे असेल, तोपर्यंत तुम्हाला पेन्शन मिळेल. जर तुमचे आयुष्य कमी राहिले तर हाय रिस्क कव्हरनुसार नॉमिनीला ज्यादा बोनस मिळेल. त्यामुळे या योजनेत तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत
- या पॉलिसीमध्ये फ्री लूक पीरिएड देखील आहे. जर पॉलिसीधारक या योजनेत संतुष्ट नाही आहे तर तो कागदपत्र मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत तो ही पॉलिसी परत देखील करू शकतो
- ही पॉलिसी तुम्ही तुमचे आई-वडील किंवा बहीण-भावाबरोबर जॉईंट स्वरूपात देखील काढू शकता.
वाचा-Lockdownमुळे भारतातील 38% स्टार्टअप्स कंगाल, काहींकडे 1 महिन्यासाठी पैसे शिल्लक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.