SBI ची बंपर ऑफर, Hyundai Venue बुक करा आणि 'हे' जिंका

SBI,Hyundai Venue, YONO - देशाची सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI )नं आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर आणलीय.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 07:18 PM IST

SBI ची बंपर ऑफर, Hyundai Venue बुक करा आणि 'हे' जिंका

मुंबई, 27 जून : देशाची सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI )नं आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर आणलीय. SBIनं ट्वीट करून माहिती दिलीय की ग्राहक SBI च्या YONO अॅपवरून हुंडई VENUE बुक करत असतील तर त्यांना हुंदई Santro कार जिंकण्याची संधी मिळू शकते. एवढंच नाही तर बँक स्वस्त व्याजदरात ऑटो कर्ज उपलब्ध करून देईल. ही ऑफर 30 जून 2019पर्यंत आहे. YONO हा SBI चा डिजिटल अॅप आहे. याद्वारे ग्राहकांना वेगवेगळ्या सेवा मिळू शकतात.

असं करायचं बुकिंग

सुरुवातीला फोनमध्ये SBI चं YONO अॅप इन्स्टाॅल करा.

आता अॅपवर रजिस्ट्रेशन करा.

तुम्ही SBI चं इंटरनेट बँकिग वापरत असाल तर युजर नेम, पासवर्ड आणि रेफरल कोड घालून सबमिट करा

Loading...

वेस्टर्न रेल्वेत 725 जागांवर भरती, 'या' उमेदवारांनी करावा अर्ज

इंटरनेट बँकिंग नसेल तर ATM कार्डाचे डिटेल्स टाका

ATM कार्ड नसेल तर मग ब्रँचमध्ये जाऊन YONO अॅपचा फायदा घ्या

IBPS च्या 8400 जागांवर व्हेकन्सी, 'या' पदांसाठी करा अर्ज

YONO अॅप डाउनलोड झाल्यावर Hyundai Venue चं बुकिंग करा

Hyundai Venue चे फीचर्स

यात 3 इंजिन आॅप्शन्स आहेत. 1.0 लीटर पेट्रोल, 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.4 लीटर डिझेल इंजिन. व्हेन्यूचा 1.0 लीटर 3 सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजन 6 स्पीड मॅनुअल ट्रान्समिशनबरोबर येईल आणि हा 120 BHP पाॅवर आणि 171 NMचा पीक टाॅर्क जनरेट करतो. सोबत 7 स्पीड डीसीटी ट्रांसमिशन आहे. 1.2 लीटरमध्ये 4 सिलिंडर पेट्रोल इंजन 5 स्पीड मॅनुअल गियरबॉक्स येईल. हे इंजिन 83 BHP मॅक्सिमम पाॅवर आणि 114 NM चा पीक टाॅर्क जनरेट करेल. 1.4 लीटरमध्ये 4 सिलेंडर डिझेल इंजिनमध्ये 6 स्पीड मॅनुअल ट्रांसमिशन असेल. हा 90 BHP ची पाॅवर आणि 219 पीक टार्क जनरेट करतो.

4 महिन्यांनंतर 'असं' बदलेल तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स

कारमध्ये सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ज

Hyundai Venue मध्ये 6 एयरबॅग्स, ESC/ESP, हिल असिस्ट कंट्रोल, ब्रेक असिस्ट सिस्टम आणि व्हेइकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट आहे.

SPECIAL REPORT : मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: SBI
First Published: Jun 27, 2019 07:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...