मुंबई, 27 जून : मोदी सरकार ड्रायव्हिंग लायसन्स ( डीएल ) तयार करण्याचे नियम सोपे बनवण्यावर काम करतंय. रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत समान ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी)च्या नव्या नियमांची माहिती दिली. 1 ऑक्टोबर 2019 पासून पूर्ण देशात ड्रायव्हिंग लायसन्स (DL ) आणि वाहनांचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) एकच असेल. आता सगळ्या राज्यांच्या DL आणि RCचा रंग एकच असेल आणि त्यातली माहिती एकाच जागी असेल. देशात रोज जवळजवळ 32 हजार डीएल इश्यू होतात किंवा रिन्यू केले जातात. रोज 43 हजार गाड्या रजिस्टर किंवा री रजिस्टर होतात. या नव्या DL किंवा RCमध्ये 15-20 रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार नाही. परिवहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या बदलामुळे ट्रॅफिक सांभाळणाऱ्यांनाही बरंच काम सोपं होईल. 2.40 लाख रुपये गुंतवून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, वर्षाला कमवा 3.20 लाख तुमचं DL बदलणार ता DL आणि RCमधल्या माहितीवर कुठलाही संभ्रम राहणार नाही. आतापर्यंत प्रत्येक राज्य आपल्या सोयीनुसार DL आणि RCचा फाॅर्मेट तयार करतं. त्यामुळे काही राज्यांच्या डीएलवर माहिती पुढच्या बाजूला तर काही राज्यांच्या डीएलवर मागच्या बाजूला असते. पण आता असं असणार नाही. सर्व राज्यांसाठी ते समान असेल. सुप्रिया सुळेंची राज्याच्या राजकारणात एण्ट्री? दिल्लीतील घडामोडींनंतर नवी चर्चा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी मंत्रालयानं 30 ऑक्टोबर 2018ला ड्राफ्ट नोटिफिकेशन पाठवून सगळ्या पक्षांची मतं घेतली होती. सर्व पक्षांच्या मतांप्रमाणे सरकारनं नवं नोटिफिकेशन काढलंय. मारहाण आणि ‘जय श्री राम’, झुंडशाहीचं लोण आता मुंबईपर्यंत पोहोचलं स्मार्ट होईल DL या स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स DL आणि RC मध्ये मायक्रोचिप आणि क्युआर कोड असतील. त्यामुळे भविष्यकाळात नियमांचं उल्लघन होण्याची शक्यता अजिबात नाही. या क्युआर कोडमुळे केंद्रीय ऑनलाइन डेटाबेसवरून ड्रायव्हर किंवा वाहनाचा आधीचा रेकाॅर्ड एका डिव्हाइसवरून वाचला जाईल. ट्रॅफिक पोलीस त्यांच्याकडच्या डिव्हाइसमध्ये कार्ड टाकून क्युआर कोड स्कॅन करू शकतात. त्यामुळे गाडी आणि ड्रायव्हर यांचे सगळे डिटेल्स मिळू शकतात. विदर्भ-मराठवाड्यात पावसाची दांडी, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







