मुंबई, 27 जून : तुम्हाला रेल्वेत नोकरी करायची असेल तर चांगली संधी आहे. वेस्टर्न रेल्वेनं वेगवेगळ्या पदांसाठी एकूण 725 व्हेकन्सी काढल्यात. यामध्ये 135 पोस्ट्स स्टेशन मास्टरसाठी आहेत. 229 पदं Goods Guard, Senior Commercial cum Ticket Clerk साठी आहेत. तर 238 व्हेकन्सी Commercial Cum Ticket Clerk साठी आहे. 123 जागा ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी आहे. स्टेशन मास्टरसाठी व्हेकन्सी वेस्टर्न रेल्वे स्टेशन मास्टर पदासाठी 135 व्हेकन्सी काढल्यात. यासाठी उमेदवार ग्रॅज्युएट हवा. या पदाची भरती मुंबईत होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 30 जुलै. IBPS च्या 8400 जागांवर व्हेकन्सी, ‘या’ पदांसाठी करा अर्ज
4 महिन्यांनंतर ‘असं’ बदलेल तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स
गुड्स गार्ड, सीनियर Commercial Cum Ticket Clerk व्हेकन्सी या पदांसाठी 229 जागा भरणार आहेत. नोकरीचं ठिकाण मुंबई आहे.दोन्ही पदांसाठी उमेदवार ग्रॅज्युएट हवा. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 30 जुलै. 2.40 लाख रुपये गुंतवून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, वर्षाला कमवा 3.20 लाख काॅमर्शियल कम तिकीट क्लर्क व्हेकन्सी वेस्टर्न रेल्वेनं काॅमर्शियल कम तिकीट क्लर्कसाठी 238 व्हेकन्सीज काढल्यात. या पदासाठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. नोकरीचं ठिकाण मुंबई आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै आहे. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, ट्रेन्स क्लर्क व्हेकन्सी या दोन्ही पदांसाठी वेस्टर्न रेल्वेनं 123 व्हेकन्सीज काढल्यात. दोन्ही पदांसाठी 12वी उत्तीर्ण हवं. 30 जुलै 2019पर्यंत अर्ज करू शकता. या सर्व पदांची घोषणा wr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर केलीय. उमेदवारांनी वेस्टर्न रेल्वेची वेबसाइट wr.indianrailways.gov.in इथे क्लिक करावं. तसंच रेल्वेनं ट्रेड अप्रेंटिसच्या 432 पदांवर भरती सुरू केलीय. यात स्टेनोग्राफर, फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, मेकॅनिक, प्लंबर आणि पेंटर अशी अनेक पदं आहेत. 15 जुलै 2019पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. apprenticeship.gov.in वर जाऊन लाॅग इन करू शकता. VIDEO : सावधान! शाळेत जाताना तुमची मुलं तर करत नाहीये ना असा प्रवास ?

)







