SBI ग्राहकांसाठी खूशखबर! आजपासून स्वस्त होणार 'या' गोष्टी, वाचतील तुमचे पैसे

SBI ग्राहकांसाठी खूशखबर! आजपासून स्वस्त होणार 'या' गोष्टी, वाचतील तुमचे पैसे

State Bank Of India, SBI - SBI नं ग्राहकांसाठी बऱ्याच ऑफर्स आणल्यात. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 01 सप्टेंबर : देशाची सर्वात मोठी बँक SBI नं आपल्या ग्राहकांसाठी सणासुदीच्या निमित्तानं एक ऑफर आणलीय. या ऑफर अंतर्गत आता कार आणि घर खरेदी करणं स्वस्त झालंय. SBIकडून सांगण्यात आलंय की, 1 सप्टेंबरपासून वेगवेगळ्या कॅटेगरीत त्यांच्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि अनेक फायद्यांसह कर्ज देण्याची तयारी केलीय. ग्राहकांना देण्यात येणाऱ्या कर्जावर बँक प्रोसेसिंग फी घेईल.

या आहेत SBIच्या ऑफर्स

1. गृहकर्ज होईल स्वस्त - तुम्ही घर खरेदी करण्याची तयारी करत असाल तर मोठी खूशखबर आहे. SBI नं गृहकर्जाच्या व्याजदरात 0.20 टक्के कपात करण्याची घोषणा केलीय. 1 सप्टेंबरपासून गृहकर्जावरचा व्याज दर 8.05 टक्के होईल.

रेल्वेचं ई तिकीट महागणार, सर्व्हिस चार्ज पुन्हा लावण्याचा रेल्वेचा निर्णय

SBI नं आपल्या MCLR मध्ये 15 बेसिस पाॅइंट्सची कपात केलीय. यामुळे गृहकर्जाच्या व्याज दरांमध्ये 35 बेसिस पाॅइंटपर्यंत कमी येणार आहे. SBI सध्या सर्वात स्वस्त हाउसिंग लोन देतेय.

SBI चं गृहकर्ज फक्त 8.05 टक्क्यांच्या व्याज दरानं उपलब्ध आहे. SBIच्या या हाउसिंग कर्जाच्या व्याज दराचा फायदा आजपासून सर्व ग्राहकांना मिळेल.

तुमचं या बँकेत खातं आहे का? बँकांच्या एकत्रीकरणामुळे हे होणार बदल

2. कार खरेदी करणं होईल स्वस्त - SBIनं कार लोनवर कुठलीच प्रोसेसिंग फी न घेण्याचा निर्णय घेतलाय. सोबत ग्राहकांना कार खरेदी करण्यासाठी 8.70 टक्के व्याज दरावर कर्ज दिलं जाईल. एखादा ग्राहक बँकेच्या डिजिटल प्लॅटफाॅर्मवरून  (YONO) किंवा बँकेच्या वेबसाइटवरून कर्जासाठी अर्ज करत असेल तर त्याला व्याजात 25 बेसिस पाॅइंटची सवलत मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कारच्या ऑनरोड किमतीवर 90 टक्क्यांपर्यंत कर्ज दिलं जाईल.

सावधान!पाकिस्तानमध्ये छापल्या जातायत 2 हजार रुपयांच्या नकली नोटा

3. पर्सनल लोनही झालं स्वस्त - SBI ग्राहकांना सणासुदीला 20 लाखापर्यंत कर्ज देण्याची तयारी करतंय. हे कर्ज मात्र 10.75 टक्के व्याज दरावर दिलं जाईल. ते चुकवण्यासाठी 6 वर्षाचा अवधी दिला जाईल. ज्यांचा सॅलरी अकाउंट बँकेत आहे त्यांना 5 लाख रुपयापर्यंत प्री अप्रूव्ह्ड लोन मिळेव. या कर्जासाठी ग्राहक YONO अॅपद्वारे 04 क्लिकमध्ये अर्ज करू शकतात.

4. स्वस्त झालं एज्युकेशन लोन - SBI नं शिक्षणासाठी आकर्षक ऑफर आणलीय. देशात किंवा परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्यांना 8.25 टक्के व्याज दरावर 1.50 कोटी रुपयापर्यंत कर्ज दिलं जाईल. ते चुकवण्यासाठी 15 वर्षाचा अवधी दिला जाईल. त्यामुळे EMIचं ओझं कमी होईल.

VIDEO: प्रवासातलं विघ्न दूर कर रे बाप्पा! भक्तांची गणरायाकडे प्रार्थना

Published by: Sonali Deshpande
First published: September 1, 2019, 12:21 PM IST
Tags: SBI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading