रेल्वेचं ई तिकीट महागणार, सर्व्हिस चार्ज पुन्हा लावण्याचा रेल्वेचा निर्णय

रेल्वेचं ई तिकीट महागणार, सर्व्हिस चार्ज पुन्हा लावण्याचा रेल्वेचा निर्णय

भारतीय रेल्वेच्या ई तिकिटावर सर्व्हिस चार्ज लावण्यात येणार आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून रेल्वेचं ई तिकीट महागणार आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे तिकिटांवरचा सेवा कर रद्द करण्यात आला होता.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : भारतीय रेल्वेच्या ई तिकिटावर सर्व्हिस चार्ज लावण्यात येणार आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून रेल्वेचं ई तिकीट महागणार आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे तिकिटांवरचा सेवा कर रद्द करण्यात आला होता. आता मात्र तो पुन्हा लावण्यात येणार आहे.

IRCTC ने नॉन एसी साठी 15 रुपये आणि एसीसाठी 30 रुपये सेवा कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या तिकिटावर वेगळा GST ही लावण्यात येईल. रेल्वे बोर्डाने या महिन्याच्या सुरुवातीला या निर्णयाला मंजुरी दिली.

याआधी रेल्वेतर्फे लावण्यात येणारा सेवा कर रद्द करण्याचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात आला होता. आता मात्र रेल्वे मंत्रालय पुन्हा हा सेवा कर लावू शकतं, असं अर्थमंत्रालायने स्पष्ट केलं आहे.

रेल्वेच्या उत्पन्नात घट

2016 - 2017 या आर्थिक वर्षात ई तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात 26 टक्क्यांची घट झाली होती. हा सेवा कर कमी केल्याचाच परिणाम होता. आता मात्र पुन्हा एकदा सेवा कर लावण्यात येणार असल्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

सणासुदीच्या आणि सुट्यांच्या दिवसात रेल्वे तिकीट मिळणंच कठीण असतं. त्यातच आता या सेवा कराची भर पडली आहे.

उद्यापासून पैसे काढण्याचे नवे नियम, जाणून घ्या याबद्दल

तुमचं या बँकेत खातं आहे का? बँकांच्या एकत्रीकरणामुळे हे होणार बदल

==============================================================================================================

VIDEO : पवार का रागावले? सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

Published by: Arti Kulkarni
First published: August 31, 2019, 4:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading