तुमचं या बँकांमध्ये खातं आहे का? बँकांच्या एकत्रीकरणामुळे हे होणार बदल

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणांसाठी काही घोषणा केल्या आहेत. बँकांच्या एकत्रीकरणामुळे काही बँकांच्या शाखा बंद होतील तर काही नव्या शाखा सुरू होतील. बँकांच्या एकत्रीकरणाचा खातेधारकांवरही परिणाम होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2019 08:23 PM IST

तुमचं या बँकांमध्ये खातं आहे का? बँकांच्या एकत्रीकरणामुळे हे होणार बदल

मुंबई, 30 ऑगस्ट : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणांसाठी काही घोषणा केल्या आहेत. बँकांच्या एकत्रीकरणामुळे काही बँकांच्या शाखा बंद होतील तर काही नव्या शाखा सुरू होतील. बँकांच्या एकत्रीकरणाचा खातेधारकांवरही परिणाम होणार आहे.

पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक यांचं एकत्रीकरण करण्यात आलं आहे. कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक यांचंही एकत्रीकरण होणार आहे. त्याचबरोबर इंडियन बँक आणि अलाहाबाद बँकेचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ग्राहकांवर काय होणार परिणाम?

1. ग्राहकांना नवा अकाउंट नंबर आणि कस्टमर आयडी मिळेल.

2. ज्या ग्राहकांना नवे अकाउंट नंबर किंवा IFSC कोड मिळतील. त्यांना ही नवी माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंट, इन्शुरन्स कंपनी, म्युच्युअल फंडस नॅशनल पेन्शन स्कीम या सगळ्या ठिकाणी अपडेट करावी लागेल.

Loading...

3. SIP किंवा कर्जाच्या हप्त्यासाठी ग्राहकांना नवा इन्स्ट्रक्शन फॉर्म भरावा लागण्याची शक्यता आहे.

4. नवं चेकबुक, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड मिळू शकतं.

5. एफडी किंवा रिकरिंग डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजात कोणताही बदल होणार नाही.

या 2 मोठ्या बँकांचं होणार एकत्रीकरण, निर्मला सीतारामन यांची घोषणा

6. घरासाठी कर्ज, वाहन कर्ज, पर्सनल लोन याच्या व्याजदरामध्येही बदल नाही.

7. बँकेच्या काही शाखा बंद पडू शकतात. त्यामुळे नव्या शाखेत जावं लागेल.

8. एकत्रीकरणानंतर इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस आणि पोस्ट डेटेड चेक क्लिअर करावे लागतील.

==========================================================================================================

लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन EXCLUSIVE VIDEO

iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-403756" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/NDAzNzU2/">

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 08:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...