सावधान! पाकिस्तानमध्ये छापल्या जातायत 2 हजार रुपयांच्या नकली नोटा

सावधान! पाकिस्तानमध्ये छापल्या जातायत 2 हजार रुपयांच्या नकली नोटा

पाकिस्तानमध्ये 2 हजार रुपयांच्या नकली नोटा छापल्या जात आहेत. त्यामुळे भारतात या नोटांबद्दल खबरदारी घ्यावी लागणार आहे. अशा नकली नोटा देशातल्या अनेक भागांत जप्त केल्यामुळे सुरक्षा यंत्रणा डोळ्यांत तेल घालून तपासणी करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : पाकिस्तानमध्ये 2 हजार रुपयांच्या नकली नोटा छापल्या जात आहेत. त्यामुळे भारतात या नोटांबद्दल खबरदारी घ्यावी लागणार आहे. अशा नकली नोटा देशातल्या अनेक भागांत जप्त केल्यामुळे सुरक्षा यंत्रणा डोळ्यांत तेल घालून तपासणी करत आहेत.

पाकिस्तानमधल्या यंत्रणांनी या नोटांची इतकी हुबेहूब नक्कल केली त्यामागे सरकारी मदतीचाही हात असणार, असा संशय भारतातल्या सुरक्षा यंत्रणांना आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि दिल्ली पोलीस अशा नकली नोटा आणि असली नोटांमधल्या फरकाचा छडा लावत आहेत. पाकिस्तानने भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा कट रचला आहे, असा निष्कर्ष नकली नोटांच्या तपासणीमध्ये निघाला आहे.

विशिष्ट प्रकारची शाई

कराचीमधल्या पाकिस्तानच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये छापल्या जाणाऱ्या या नोटांमध्ये ऑप्टिकल व्हेरिएबल इंक या प्रकारच्या शाईचा वापर करण्यात येतो आहे. ही शाई नोटेवर हिरव्या रंगाची दिसते. नोट वरखाली केली की या शाईचा रंग बदलून निळा होतो.आयएसआयने अशा प्रकारे 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटांची हुबेहूब नक्कल केली आहे. त्यामुळे या नोटा पुन्हापुन्हा तपासून घ्याव्या लागणार आहेत.

उद्यापासून पैसे काढण्याचे नवे नियम, जाणून घ्या याबद्दल

नोटांवरच्या नंबरचीही नक्कल

भारतीय नोटांच्या खालच्या भागातल्या उजव्या कोपऱ्यात सीरीज नंबरचीही नक्कल केली आहे. इकॉनॉमिक टाइम्समध्ये आलेल्या बातमीनुसार, 24 ऑगस्टला दिल्लीमधल्या नेहरू प्लेसमध्ये असलम अन्सारी या व्यक्तीला पकडलं होतं. त्याच्याकडून 2 हजार रुपयांच्या नोटा असलेली 5 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली. असलम मूळचा नेपाळचा राहणारा आहे.

===============================================================================================

VIDEO : शरद पवार मोठे नेते, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 06:47 PM IST

ताज्या बातम्या