Home /News /money /

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! मोठ्या पेमेंटसाठी 1 जानेवारीपासून लागू होणार हा नियम

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! मोठ्या पेमेंटसाठी 1 जानेवारीपासून लागू होणार हा नियम

स्टेट बँक ऑफ इंडिया 1 जानेवारीपासून पॉझिटिव्ह पे सिस्टम (Positive Pay System) लागू करणार आहे. या नवीन सिस्टिम अंतर्गत चेकच्या माध्यमातून 50,000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट करण्यासाठी काही आवश्यक माहिती दोन वेळा सुनिश्चित करावी लागेल.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 29 डिसेंबर: देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India SBI) पॉझिटिव्ह पे सिस्टम (Positive Pay System) लागू करणार आहे. या नवीन सिस्टिम अंतर्गत चेकच्या माध्यमातून 50,000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट करण्यासाठी काही आवश्यक माहिती दोन वेळा सुनिश्चित करावी लागेल. 1 जानेवारी 2021 पासून हा नियम लागू केला जाणार आहे. आरबीआयने (Reserve Bank of India RBI) याबाबतीत गाइडलाइन्स देखील जारी केल्या आहेत. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, 1 जानेवारी 2021 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टम (Positive Pay System) लागू करण्यात येईल, जेणेकरून चेक जमाकर्त्यांना फसवणुकीपासून वाचण्यासाठी मदत मिळेल. आरबीआयच्या 'पॉझिटिव्ह पे सिस्टम' (Positive Pay System) अंतर्गत चेक पेमेंटच्या  (Cheque Payment) माध्यमातून 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेसाठी काही माहिती पुन्हा एकदा कन्फर्म करावी लागेल. हे खातेधारकावर असेल की त्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे की नाही. तुमच्या जवळच्या शाखेमध्ये याबाबत सविस्तर माहिती मिळेल. मात्र अशी शक्यता देखील आहे की 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे चेक पेमेंट करायचे असल्यास ही योजना अनिवार्य केली जाईल. एसबीआय प्रमाणेच इतर बँकांमध्ये देखील ही सुविधा लागू केली जाणार आहे. कसे काम करेल पॉझिटिव्ह पे सिस्टम? या सुविधेअंतर्गत, जी व्यक्ती चेक जारी करेल त्या व्यक्तीला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून खाते क्रमांक, चेकची तारीख, लाभार्थीचे नाव, प्राप्तकर्ता (Payee) आणि पेमेंटची रक्कम याबाबत पुन्हा एकदा माहिती अदाकर्ता बँक (Drawee Bank)  द्यावी लागेल. चेक जारी करणारी व्यक्ती ही माहिती एसएमएस, मोबाइल App, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देऊ शकतो. (हे वाचा-Mutual Funds मध्ये गुंतवणूक करताय? नव्या वर्षापासून होणार हे 5 महत्त्वाचे बदल) यानंतर पेमेंटआधी ही सर्व माहिती तपासून पाहिली जाईल. जर यामध्ये काही गोंधळ असल्यास हा व्यवहार 'चेक ट्रंकेशन सिस्टम' (CTS - Cheque Truncation System) अंतर्गत मार्क करून याबाबत ज्या बँकेतून पैसे दिले जाणार आहेत आणि ज्या बँकेत पैसे जमा होणार आहेत त्यांना माहिती दिली जाईल. आरबीआयने अशी माहिती दिली आहे अशा परिस्थितीत योग्य पावलं उचलली जातील. (हे वाचा-तुम्ही LIC पॉलिसी घेणार असाल तर या बाबतीत व्हा सावधान! अन्यथा बुडतील सर्व पैसे) काही दिवसांंपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी ऑगस्ट महिन्यात एमपीसीच्या बैठकीत याबाबत घोषणा केली होती. चेक पेमेंटवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी आरबीआयने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय बँकेने याबाबत ग्राहकांमध्ये जागरुकता पसरवण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांमध्ये याबाबत जागरूकता असणे गरजेचे आहे, असे RBI ने म्हटले आहे. बँक हे काम एसएमएस अलर्ट, शाखेमध्ये नोटीस लावणे, एटीएम, वेबसाइटवर माहिती देणे आणि इंटरनेट बँकिंगच्या साहाय्याने पूर्ण करेल. या निर्णयामुळे असुरक्षित पेमेंटची भीती राहणार नाही.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: SBI, Sbi account, SBI bank

    पुढील बातम्या