Home /News /money /

Mutual Funds मध्ये गुंतवणूक करताय? नव्या वर्षापासून होणार हे 5 महत्त्वाचे बदल

Mutual Funds मध्ये गुंतवणूक करताय? नव्या वर्षापासून होणार हे 5 महत्त्वाचे बदल

तुम्ही म्युच्यूअल फंडमध्ये (Mutual Funds) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सेबी (SEBI) 1 जानेवारीपासून म्युच्यूअल फंडाबाबतच्या काही महत्त्वाच्या नियमात बदल करणार आहेत.

    नवी दिल्ली, 29 डिसेंबर: सध्या म्युच्यूअल फंड हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानला जातो. तुम्ही देखील म्युच्यूअल फंडमध्ये (Mutual Funds) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सेबी (SEBI) 1 जानेवारीपासून म्युच्यूअल फंडाबाबतच्या काही महत्त्वाच्या नियमात बदल करणार आहेत. गुंतवणूकदारांना म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीची प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शी वाटावी याकरता हे बदल केले जात आहेत. तुम्हाला गुंतवणूक केल्यांनंतर कोणत्याही अडचणींना सामारे जावे लागू नये याकरता जाणून घ्या काय आहेत के महत्त्वाचे बदल- 1. 75% हिस्सा इक्विटीमध्ये गुंतवणे अनिवार्य 1 जानेवारी 2021 पासून बदल होणाऱ्या नव्या नियमानुसार आता या फंड्समध्ये कमीतकमी 75 टक्के हिस्सा इक्विटीमध्ये गुंतवणे आवश्यक आहे. याआधी ही मर्यादा 65 टक्के होती. शिवाय मल्टीकॅप इक्विटी म्युच्यूअल फंड्स स्कीममध्ये कमीतकमी 25-25 टक्के हिस्सा लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणे अनिवार्य असेल. (हे वाचा-मोदी सरकारने कांद्याबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय; 1 जानेवारीपासून दिसणार परिणाम) 2. NAV कॅल्क्यूलेशनमध्ये बदल 1 जानेवारी 2021 पासून नेट अॅसेट व्हॅल्यू अर्थात पर्चेस NAV, अॅसेट मॅनेजमेंट कंपनीकडे पैसे पोहोचल्यानंतर मिळेल. गुंतवणूक कितीही मोठी असली तरी हा नियम असणार आहे. हा नियम लिक्विड आणि ओव्हरनाइट म्युच्यूअल फंड स्कीमवर लागू होणार नाही. सध्या प्रति दिन 2 लाखांपर्यंचा पर्चेस NAV, पैसे AMC कडे पोहोचण्याआधी मिळत असे. 3. इंटर-स्कीम ट्रान्सफरचे नियम बदलले 1 जानेवारी 2021 पासून क्लोज एंडेड फंड्स (close-ended funds) चे इंटर-स्कीम ट्रान्सफर (inter-scheme transfer) गुंतवणूकदारांना स्कीमचे यूनिट अलॉट झाल्यानंतर केवळ 3 कामकाजाच्या दिवसांमध्ये करावं लागेल. (हे वाचा-तुम्ही LIC पॉलिसी घेणार असाल तर या बाबतीत व्हा सावधान! अन्यथा बुडतील सर्व पैसे) 4. डिव्हिडेंड ऑप्शनचे नाव बदलणार एप्रिल महिन्यापासून म्युच्यूअल फंड्सना डिव्हिडेंड ऑप्शनचे नाव बदलून  इनकम डिस्ट्रीब्यूशन कम कॅपिटल विड्रॉअल (income distribution cum capital withdrawal) करावे लागेल. सेबीने याबाबत निर्धेश आधीच जारी केले आहेत. 5. नवीन रिस्कोमीटर टूल सेबी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीआधी रिस्कचा अंदाज लावण्यासाठी रिस्कोमीटर टूलची सुविधा देते. आता या टूल मध्ये 1 जानेवारी 2021 पासून Very High Risk ही कॅटेगरी देखील जोडण्यात येणार आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Investment, Money, Personal finance

    पुढील बातम्या