Home /News /money /

तुम्ही देखील LIC पॉलिसी घेणार असाल तर या बाबतीत व्हा सावधान! अन्यथा बुडतील सर्व पैसे

तुम्ही देखील LIC पॉलिसी घेणार असाल तर या बाबतीत व्हा सावधान! अन्यथा बुडतील सर्व पैसे

तुम्ही देखील LIC पॉलिसी (Life Insurance Corporation)खरेदी केली आहे किंवा पॉलिसी घेण्याचा विचार करत आहात का? अशावेळी तुम्हाला जर या पॉलिसीबाबत चुकीची माहिती देणारे फोन येत असतील वेळीच सावध व्हा.

    नवी दिल्ली, 29 डिसेंबर: तुम्ही देखील LIC पॉलिसी (Life Insurance Corporation) खरेदी केली आहे किंवा पॉलिसी घेण्याचा विचार करत आहात का? अशावेळी तुम्हाला जर या पॉलिसीबाबत चुकीची माहिती देणारे फोन येत असतील वेळीच सावध व्हा. या फोन कॉल्सवरून ग्राहंकाना चुकीची माहिती दिली जाते आहे. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध होणे गरजेचे आहे. गेल्या काही काळापासून अशी काही प्रकरणं समोर आली आहेत. हे भामटे ग्राहकांना बोलण्यात गुंतवून पैसे लुबाडतात. अशाप्रकारच्या घटना घडू नये म्हणून LIC कडूनच ग्राहकांना सावध करण्यात आले आहे. LIC ने ट्विटरवरून ग्राहकांना अशा फोन कॉल्सपासून सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. हे भामटे पॉलिसी बाबत चुकीची माहिती देत फसवणूक करतात. शिवाय ते LIC चे अधिकारी असल्याचं भासवत असल्याने अनेकदा ग्राहक देखील त्यांच्या बोलण्याला फसतात. पॉलिसीची रक्कम त्वरित देण्याचं सांगत अनेकांती फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. LIC ने अशाप्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत -जर तुम्हाला पॉलिसीबाबत कोणतीही माहिती हवी असेल तर www.licindia.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊनच माहिती मिळवा. कोणत्याही क्रमांकावर फोन करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. -शिवाय तुम्हाला एखादा फसवा फोन कॉल आलाच तर जवळच्या पोलीस ठाण्यात कॉल करा. spuriouscalls@licindia.com या लिंकवर क्लिक करून तुम्ही रिपोर्ट देखील पाठवू शकता. (हे वाचा-EPFO कर्मचाऱ्यांच्या खात्यात पाठवणार इतकी रक्कम?1 जानेवारीपर्यंत बदलाची शक्यता) -अशाप्रकारे फोन कॉल आल्यास त्यावर दीर्घकाळ बातचीत करू नका तसंच कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका. -या फोन कॉलवर पॉलिसी सरेंडरविषयीही माहिती देऊ नका. पॉलिसी डिटेल्स देखील अशा प्रकारे कोणत्याही फोन कॉलवर शेअर करू नका. ही माहिती मिळवण्यासाठी एलआयसी ग्राहकांना फोन करत नाही हे लक्षात घ्या. बनावट फोन कॉलपासून रहा सावधान LIC ने जारी केलेल्या अलर्टमध्ये असं म्हटलं आहे की, कंपनी कोणत्याही ग्राहकाला पॉलिसी सरेंडर करण्याचा सल्ला देत नाही. ग्राहकांनी हे फोन कॉल्स न घेण्याचा सल्ला एलआयसीने दिली आहे. एलआयसीने ग्राहकांना सल्ला दिला की त्यांनी त्यांच्या पॉलिसीला LICच्या अधिकृत वेबसाइटवर रजिस्टर करावे आणि तिथूनच योग्य माहिती प्राप्त करावी.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Insurance, Money

    पुढील बातम्या