मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI Multi Currency Foreign Travel Card: परदेशात गेल्यावर राहणार नाही विदेशी चलनाचं टेन्शन, जाणून घ्या कशाप्रकारे मिळवाल हे कार्ड

SBI Multi Currency Foreign Travel Card: परदेशात गेल्यावर राहणार नाही विदेशी चलनाचं टेन्शन, जाणून घ्या कशाप्रकारे मिळवाल हे कार्ड

तुम्ही परदेशी जाणार असाल तरी त्या देशातील चलनाबाबत तुम्हाला टेन्शन राहणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया मल्टी- करन्सी फॉरेन ट्रॅव्हल कार्ड (SBI Multi Currency Foreign Travel Card) हे प्रीपेड करन्सी कार्ड देऊ करते. जाणून घ्या फायदे आणि इतर सविस्तर माहिती

तुम्ही परदेशी जाणार असाल तरी त्या देशातील चलनाबाबत तुम्हाला टेन्शन राहणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया मल्टी- करन्सी फॉरेन ट्रॅव्हल कार्ड (SBI Multi Currency Foreign Travel Card) हे प्रीपेड करन्सी कार्ड देऊ करते. जाणून घ्या फायदे आणि इतर सविस्तर माहिती

तुम्ही परदेशी जाणार असाल तरी त्या देशातील चलनाबाबत तुम्हाला टेन्शन राहणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया मल्टी- करन्सी फॉरेन ट्रॅव्हल कार्ड (SBI Multi Currency Foreign Travel Card) हे प्रीपेड करन्सी कार्ड देऊ करते. जाणून घ्या फायदे आणि इतर सविस्तर माहिती

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 12 ऑक्टोबर: देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन सुविधा लाँच (SBI New Service)  करत असते. आता तुम्ही परदेशी जाणार असाल तरी त्या देशातील चलनाबाबत तुम्हाला टेन्शन राहणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया मल्टी- करन्सी फॉरेन ट्रॅव्हल कार्ड (SBI Multi Currency Foreign Travel Card) हे प्रीपेड करन्सी कार्ड देऊ करते. ज्यात सात चलनांपर्यंतचे पैसे प्री- लोड करून परदेशातील एटीएम्स आणि मर्चंट पॉइंट्सवर वापरता येतात. परदेशात असताना पैसे बाळगण्याचा हा स्मार्ट पर्याय आहे. हे कार्ड वापरून ग्राहकांना 2 दशलक्ष एटीएम्समधून पैसे काढता येतील तसेच जगभरातील 34.5 दशलक्ष दुकाने, हॉटेल्स व रेस्तराँमध्ये वस्तू व सेवांची खरेदी करता येईल.

वैशिष्ट्ये आणि फायदे

>> चिप आणि पिनने सुरक्षित करण्यात आलेले प्रीपेड ट्रॅव्हल कार्ड

>> एका कार्डावर विविध करन्सीज

>> बॅकअपसाठी अतिरिक्त कार्ड उपलब्ध

>> कार्ड हरवल्यास किंवा चोरी झाल्यास 24/7 आंतरराष्ट्रीय स्तरावर सहाय्य, मोफत रिप्लेसमेंट कार्ड

>> हे कार्ड मिळवण्यासाठी किंवा वापरण्याची सुरुवात करण्यासाठी बँक खात्याच्या माहितीची गरज नाही.

>> कार्डवरील मुदतीच्या तारखेपर्यंत रिलोड करण्याची सुविधा, त्यासाठी अधिकृत पासपोर्ट आणि एसबीआयच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या फॉर्म ए 2 ची गरज

Jhunjhunwala यांनी या शेअर्समधून कमावले 310 कोटी रुपये,तुम्ही गुंतवणूक केली आहे?

SBI मल्टी- करन्सी फॉरेन ट्रॅव्हल कार्ड कसे मिळवाल?

एसबीआयच्या सध्याच्या तसेच नव्या ग्राहकांना ही कार्ड्स बँकेच्या जवळच्या शाखेला भेट देऊन किंवा एसबीआय संकेतस्थळावर लॉग इन करून मिळवता येतील. हे कार्ड 1100 पेक्षा जास्त शाखांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. https://www.sbitravelcard.com/ यावर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

ट्रॅव्हल कार्ड वापरून ग्राहकांना पुढील सेवा घेता येतील -

>> कार्डाचे ऑनलाइन व्यवस्थापन उर्वरित रक्कम आणि व्यवहार तपशीलांच्या सुरक्षित दृश्यमानतेसह

>> हे कार्ड वापरून एटीएम लोकेटर्ससारख्या सेवाही घेता येतात

>> या ट्रॅव्हल कार्डाच्या मदतीने युजर्सना कार्ड प्रत्येक वेळेस रिलोड करताना त्यांच्या करन्सीजवर विनियम दर निश्चित करता येतात.

>> कार्डावर अमेरिकी दर, ब्रिटिश पाउंड्स, युरोज, सिंगापूर डॉलर्स, ऑस्ट्रेलियन डॉलर्स, कॅनेडियन डॉलर्स आणि युएई दिरहम लोड करता येतात.

>> व्यवहाराचे पैसे भरण्यासाठी करन्सीमध्ये पुरेसे पैसे नसल्यास उर्वरित रक्कम कार्डावर उपलब्ध असलेल्या इतर करन्सीजमधून आपोआप वजा होते.

Gold Rate Today: सोन्याचा दर 9059 रुपयांनी स्वस्त, तपासा आजचा लेटेस्ट भाव

>> परदेशात असताना ग्राहकांना विनिमय दरातील चढउतार आणि भिन्नता टाळता येईल.

>> स्पष्ट व पारदर्शी शुल्कामुळे तुम्हाला बजेट चांगल्या प्रकारे नियंत्रित करता येते.

>>  कार्ड हरवल्यास किंवा चोरी झाल्यास कार्डावर उपलब्ध असलेल्या रकमेइतकी इमरजन्सी कॅश रिप्लेसमेंट टीमतर्फे दिली जाते.

काय आहे मर्यादा?

>> कार्डावर किमान 200 डॉलर्सपर्यंतची रक्कम लोड करता येऊ शकते.

>> एटीएममधून काढता येण्याइतकी किंवा मर्चंट पॉइंटवर खर्च करता येण्याइतकी सर्वाधिक रक्कम म्हणजे 10,000 अमेरिकी डॉलर्स.

>> ग्राहकाला एका वेळेस एकच सक्रिय खाते वापरता येईल.

>> काही एटीएम ऑपरेटर्स आणि मर्चंट्स पैसे काढण्यावर शुल्क आकारू शकतील किंवा नियमांनुसार त्यांच्या मर्यादा घालू शकतील.

पुढील पायऱ्यांच्या मदतीने तुमचे कार्ड सुरक्षित ठेवा

>> कार्ड मिळाल्यावर लगेचच त्याच्या पाठीमागे सही करावी

>> पिन लक्षात ठेवावा.

>> मल्टी- करन्सी ट्रॅव्हल कार्ड बँक खात्याला जोडलेले नसल्यामुळे ते अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्य आहे.

>> जर कार्ड अधिकृत असेल आणि ग्राहकाला ते पुढच्या सहलीपर्यंत ठेवायचे असेल, तर परदेशात असताना मास्टरकार्ड अक्सेप्टन्स मार्क दर्शवणाऱ्या एटीएममधून उर्वरित रक्कम काढता येईल.

First published:

Tags: SBI, Sbi account, SBI bank, SBI Bank News