Home /News /money /

SBI नं ग्राहकांना दिली मोठी भेट, आजपासून 'इतकं' स्वस्त झालं गृहकर्ज

SBI नं ग्राहकांना दिली मोठी भेट, आजपासून 'इतकं' स्वस्त झालं गृहकर्ज

एमसीएलआर कमी केल्यानं सर्वसाधारण व्यक्तींचा फायदा होऊ शकतो. त्यांचं सुरू असलेलं EMI कमी होतं.

    मुंबई, 10 मे : देशातली सर्वात मोठी सरकारी बँक ( SBI )नं आपल्या ग्राहकांसाठी कर्ज स्वस्त केलंय. बँकेनं मार्जिनल काॅस्ट आॅफ लॅण्डिंग रेट (MCLR ) कमी करण्याची घोषणा केलीय. यामुळे आता गृहकर्ज, आॅटो लोन, पर्सनल लोन स्वस्त होईल. एमसीएलआर कमी केल्यानं सर्वसाधारण व्यक्तींचा फायदा होऊ शकतो. त्यांचं सुरू असलेलं EMI कमी होतं. 10 एप्रिल रोजी बँकेनं 0.10 टक्क्यापर्यंत व्याजदर कमी केलं होतं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ( RBI ) बैठकीत रेपो रेट 0.25 टक्के कमी करण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर अनेक बँकांनी आपला व्याज दर कमी करण्याची घोषणा केली. RBIची पुढची बैठक जूनमध्ये होईल. Air India offer : तुम्हालाही प्रवासात मिळू शकते ही 40 % सवलत स्वस्त झालं गृहकर्ज आणि पर्सनल लोनवरचं EMI - SBIनं मार्जिनल काॅस्ट आॅफ लॅण्डिंग ( MCLR )मध्ये 0.05 टक्के कपात केलीय. एक वर्षांत कर्जावर एमसीएलआर 8.50 टक्के कमी होऊन 8.45 टक्के झालंय. कशी करायची पाॅकेटमनीची बचत? मुलांना लहानपणापासून 'असं' शिकवा प्लॅनिंग 1 मेपासून SBIनं बदललाय हा नियम - SBI नं 1 मेपासून कर्जामध्ये बराच बदल केलाय. बँकेनं रेपो रेटला बँकेच्या दरांना जोडलंय. हा निर्णय एक लाख रुपयांहून जास्त कर्ज घेणाऱ्यांना आहे. नवा नियम लागू झाल्यानंतर एक लाख रुपये डिपाॅझिटवर 3.5 टक्के व्याज मिळतंय. तसंच 1 लाख रुपयांपेक्षा जास्त डिपाॅझिटवर व्याज दर 3.25 टक्के आहे. स्पाइसजेट देतेय मोफत फिरायची संधी, जाणून घ्या ऑफर जूनमध्ये पुन्हा स्वस्त होऊ शकतं कर्ज - RBI या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात रेपो रेटमध्ये 0.25 टक्के आणखी कपातीचा विचार करू शकते. कोटक इकाॅनाॅमिक रिसर्चमध्ये अशी आशा व्यक्त केलीय. सूत्रांच्या माहितीनुसार घरगुती विकास दराची चिंता लक्षात घेता रिझर्व्ह बँक पुढेही व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते. या महिन्यात झालेल्या बैठकीतही 0.25 टक्के कमी केली होती. VIDEO: मोदींनी समजवला विरोधकांच्या टीका करण्याचा फॉर्म्युला
    First published:

    Tags: SBI, State bank of india

    पुढील बातम्या