Home /News /money /

Air India offer : तुम्हालाही प्रवासात मिळू शकते ही 40 % सवलत

Air India offer : तुम्हालाही प्रवासात मिळू शकते ही 40 % सवलत

जेट एअरवेज बंद झाल्यानंतर विमान प्रवास एकदम महाग झाला. प्रवासी चिंतेत पडले. अशातच एअर इंडियानं प्रवाशांना दिलासा दिलाय.

    मुंबई, 10 मे : जेट एअरवेज बंद झाल्यानंतर विमान प्रवास एकदम महाग झाला. प्रवासी चिंतेत पडले. अशातच एअर इंडियानं प्रवाशांना दिलासा दिलाय. एअर इंडियाच्या आॅफरनुसार तुम्ही 3 तास अगोदर विमानाचं तिकीट बुक केलंत तर तुम्हाला 40 टक्के डिस्काउंट मिळेल. ज्या लोकांना तातडीनं विमान प्रवास करावा लागतो त्यांना तिकिटांच्या किमती जास्त द्यावा लागतात. म्हणूनच एअर इंडियानं हे पाऊल उचललंय. स्पाइसजेट देतेय मोफत फिरायची संधी, जाणून घ्या ऑफर एअर इंडियानं काढलेल्या पत्रकात म्हटलंय की, अचानक तिकीट बुक करावं लागलं तर प्रवाशांना ते महाग पडतं. म्हणून घरगुती फ्लाइट्ससाठी ही आॅफर आणलीय. विमान उड्डाणाच्या 3 तास आधी सीट बुक केली तर 40 टक्के डिस्काउंट दिला जाईल. CA च्या पदासाठी मोठी भरती, 'असा' करा अर्ज अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या रिव्ह्यू मीटिंगमध्ये हा निर्णय झाला. एअर इंडियाच्या सर्व आऊटलेटवरून ही तिकिटं खरेदी करता येतीलच. शिवाय एअर इंडिया बुकिंग काउंटर, एअर इंडिया मोबाइल अॅप, एअर इंडिया वेबसाइट आणि ट्रॅव्हल एजंट इथूनही तिकिटं खरेदी करता येतील. कशी करायची पाॅकेटमनीची बचत? मुलांना लहानपणापासून 'असं' शिकवा प्लॅनिंग गेल्या महिन्यात एअर इंडियानं आंतरराष्ट्रीय ठिकाणी अडकलेल्या जेट एअरवेजच्या प्रवाशांना खास आॅफर दिली होती. जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यानं आधी बुकिंग करून परदेशी असलेल्या प्रवाशांना एअर इंडियानं खास आॅफर दिली होती. ती आॅफर अशी आहे, की ज्या प्रवाशांकडे जेट एअरवेजचं कन्फर्म तिकीट आहे, त्यांना  एअर इंडिया 'स्पेशल स्टॅण्डर्ड पॅसेंजर' ही आॅफर मिळतेय. एअर इंडियाचं विमान त्या स्थळी जाणार असेल तर त्या प्रवाशांना याचा फायदा होऊ शकतो. VIDEO : शीख दंगलींच्या मुद्द्यावरून मोदींनी काँग्रेसवर केले गंभीर आरोप
    First published:

    Tags: Air india, Discount

    पुढील बातम्या