मुंबई, 10 मे : कमी दराची विमानसेवा स्पाइसजेट आपल्या प्रवाशांना मोफत प्रवास करण्याची संधी देतेय. स्पाइसजेट एक नवी आॅफर घेऊन आलीय. यात तुम्हाला तिकिटाचे पूर्ण पैसे परत मिळतील. स्पाइसजेटच्या आॅफरमध्ये तुम्ही ज्या पैशाचं तिकीट बुक कराल ते सगळे पैसे स्टाइलकॅशनं तुम्हाला परत मिळतील.
30 सप्टेंबरपर्यंत आहे ही ऑफर
स्टाइलकॅश स्पाइसजेटची आॅनलाइन शाॅपिंग वेबसाइट स्पाइसस्टाइल डाॅट काॅमवरून तुम्ही शाॅपिंग करू शकता. तिकिटाचे पैसे कंपनी spicestyle.com अकाउंटमध्ये टाकेल. ते पैसे तुम्ही आॅनलाइन शाॅपिंगसाठी वापरू शकता. ही आॅफर 30 सप्टेंबर 2019पर्यंत आहे.
CA च्या पदासाठी मोठी भरती, 'असा' करा अर्ज
Now your SpiceJet flights are effectively free. Travel with SpiceJet and earn StyleCash equivalent to your entire booking amount. Head over to https://t.co/wDsLQ8XjhA, and make the most of your StyleCash to buy the latest, trendiest apparel, accessories and more. pic.twitter.com/VIxCJO8aMg
— SpiceJet (@flyspicejet) 1 May 2019
'ही' आहे Post Office ची सर्वोत्तम योजना, दर महिन्याला मिळवा 5,500 रुपये
जाणून घ्या नियम आणि अटी
तुम्ही ज्या किमतीचं तिकीट बुक केलंत, त्यातले 30 टक्के तुम्ही एकदा शाॅपिंगला वापरू शकता. शाॅपिंगनंतर शाॅपिंग कार्ट व्हॅल्यूमधून ते कमी होईल. तुम्ही कुठल्याही ई काॅमर्सच्या वेबसाइटवर जाऊन खरेदी करण्यासाठी सिलेक्ट करता तेव्हा ते शाॅपिंग कार्टमध्ये जाऊन पडतं. तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करायच्या नाहीत त्या तुम्ही शाॅपिंग कार्टमधून काढू टाकू शकता.
शिक्षक मुलाला नोकरीच नाही, बेरोजगारीच्या नैराश्यातून आईची आत्महत्या
या ऑफरसाठी तुम्ही कमीत कमी 1999 रुपयांचं शाॅपिंग करू शकता. तिकिटांच्या किमतीचं कॅशबॅक 5 हजार रुपयांपर्यंत होईल. तिकीट बुक करण्यासाठी 3 महिन्यांच्या आत आॅफरचा फायदा तुम्ही घेऊ शकता. या आॅफरचा वापर करताना दुसऱ्या कुठल्या कुपन कोडच्या डिस्काउंट आॅफरचा उपयोग करता येणार नाही. ही आॅफर 30 सप्टेंबर 2019पर्यंत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Spicejet