कशी करायची पाॅकेटमनीची बचत? मुलांना लहानपणापासून 'असं' शिकवा प्लॅनिंग

कशी करायची पाॅकेटमनीची बचत? मुलांना लहानपणापासून 'असं' शिकवा प्लॅनिंग

मुलांना पाॅकेटमनीचीही कशी बचत करायची, हे शिकवलं तर त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्याचा फायदा होईल.

  • Share this:

मुंबई, 10 मे : आता शाळा-काॅलेजांना सुट्ट्या लागल्यात. पालक सुट्टीतही आपल्या मुलांना पाॅकेटमनी देत असतात. पण मुलांना पाॅकेटमनीचीही कशी बचत करायची, हे शिकवलं तर त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्याचा फायदा होईल. कारण एकदा का शिक्षण संपून नोकरी लागली की आयुष्यात बचत, गुंतवणूक या गोष्टी कराव्याच लागतात. त्याची सवय मुलांना पाॅकेटमनीच्या बचतीपासून केली की नक्कीच फायदा होईल.

स्पाइसजेट देतेय मोफत फिरायची संधी, जाणून घ्या ऑफर

पाॅकेटमनी घेऊन मुलं बाहेर जातात. कधी मित्रांच्या घरी जातात. कधी मित्र-मैत्रिणी मिळून फिरायला जातात. आता मुलं स्वत:च्या कारनं किंवा टॅक्सीनं बाहेर जातात. अशा वेळी त्यांना बसनं प्रवास करायची सवय लावली किंवा तशी आवड निर्माण केली तर त्यांना ते नक्कीच फायदेशीर होईल. त्यांच्या पाॅकेटमनीमधले पैसे वाचतील. त्याचा उपयोग ते करू शकतात.

'ही' आहे Post Office ची सर्वोत्तम योजना, दर महिन्याला मिळवा 5,500 रुपये

सुट्टीत शिबिरांचं अगदी पिक आलं असतं. शेजारचा जातोय किंवा मित्रमैत्रीण जाते म्हणून  मीही जाणार, हा हट्ट मुलांचा असतो. तो चुकीचा आहे, याची जाणीव पालकांनी करून द्यावी. आपल्या योग्य शिबिरातच मुलांनी प्रवेश करावा, हे पालकांनी मुलांना समजून सांगावं. कधी कधी शिबिरात न जाता मित्रमैत्रिणी जमूनही बरेच खेळ खेळता येतात. अगदी पालकही स्वत: मुलांना जमवून अशा काही रंजक गोष्टी करू शकतात. त्यानं शिबिराचे पैसे वाचू शकतात.

Loading...

CA च्या पदासाठी मोठी भरती, 'असा' करा अर्ज

मुलांना पाॅकेटमनीची बचत कशी करायची हे नुसतं सांगून उपयोग नाही तर प्रोत्साहनात्मक त्यांना याबद्दल बक्षीसही दिलं पाहिजे. या आठवड्यात तू किती पैसे वाचवतेस किंवा वाचवतोस, मग तेवढ्या पैशांचं बक्षीस तुला देऊ असं सांगायचं आणि बक्षीस द्यायचंही. मग मुलं स्वत:हून पाॅकेटमनीचा बचत सुरू करतील.


VIDEO: 'जाणता राजाला येऊ दे नाही तर पंटरला येऊ दे' पाटलांचं पवारांना ओपन चॅलेंज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2019 05:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...