जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! थेट खिशावर होणार परिणाम

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! थेट खिशावर होणार परिणाम

एसबीआय बँक

एसबीआय बँक

SBI MCLR Hike: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने कोट्यवधी ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेने एमसीएलआरमध्ये 5 टक्के वाढ केली आहे. आता ग्राहकांना लोनवर पहिल्यापेक्षा जास्त ईएमआय द्यावा लागणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 जुलै : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने सर्व कालावधीसाठी आपला मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) 0.05 टक्क्यांनी वाढवला आहे. बँकेचे नवीन दर 15 रेट 2023 पासून लागू झाले आहेत. या वाढीसह, ज्या कर्जदारांनी MCLR वर कर्ज घेतले आहे त्यांचा EMI वाढेल. इतर मानक व्याजदराने कर्ज घेतलेल्या कर्जदारांना यामुळे काही फरक पडणार नाही.

News18लोकमत
News18लोकमत

जास्तीत जास्त कंज्यूमर लोन एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटच्या आधारावर होते. अशा वेळी एमसीएलआरमध्ये वाढीमुळे पर्सनल लोन, ऑटो आणि होम लोन महाग होऊ शकतात. आता तुम्हाला लोन घेतल्यावर पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल. ग्राहकांच्या खिशावर याचा थेट परिणाम होणार आहे. SBI मध्ये अकाउंट नाही, तरीही YONO अ‍ॅपद्वारे करु शकता UPI पेमेंट, पाहा प्रोसेस! नवीन MCLR रेट या वाढीसह, एका वर्षासाठी MCLR वाढून 8.55 टक्के झाला आहे, जो पूर्वी 8.50 टक्के होता. बहुतेक कर्जे एका वर्षाच्या MCLR दराशी जोडलेली असतात. एक महिना आणि 3 महिन्यांचा MCLR 0.05 टक्क्यांनी वाढून अनुक्रमे 8 टक्के आणि 8.15 टक्के झाला आहे. त्याच वेळी, 6 महिन्यांसाठी एमएसएलआर 8.45 टक्के असेल. Home Loan घेण्याचा विचार करताय? या 5 बँका देताय सर्वात स्वस्त गृहकर्ज MCLR म्हणजे काय? विशेष म्हणजे, MCLR ही भारतीय रिझर्व्ह बँकेने विकसित केलेली एक पद्धत आहे, ज्याच्या आधारे बँका कर्जासाठी व्याजदर ठरवतात. त्याआधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठी व्याजदर निश्चित करत असत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात