मुंबई, 21 ऑक्टोबर: तुम्ही जर देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे (
State Bank of India Customer) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची आहे. बँकेच्या या सुविधेमुळे तुमचा फायदा तर होणारच आहे पण त्याचबरोबर वेळही वाचणार आहे. बँकेकडून ग्राहकांना अनेक विशेष सुविधा दिल्या जातात. बँकेने कोरोना संकटात ग्राहकांसाठी घरपोच बँकिंग सुविधाही (
SBI Doorstep Banking) सुरू केली आहे. यामध्ये पैसे काढण्यापासून ते पे ऑर्डरपर्यंत, नवीन चेकबुक, नवीन चेकबुक रिक्विझेशन स्लिप तुम्हाला विविध प्रकारच्या सुविधा देत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या घरपोच सेवेमधून पैसे काढण्याची किमान मर्यादा 1000 रुपये आहे आणि कमाल मर्यादा 20,000 रुपये आहे. रोख रक्कम काढण्याच्या विनंतीपूर्वी बँक खात्यात पुरेशी शिल्लक असणे अनिवार्य आहे. अन्यथा तुमचे ट्रान्झॅक्शन रद्द होऊ शकते.
आधी नोंदणी करावी
या बँकिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल. तुम्ही https://bank.sbi/dsb या अधिकृत लिंकवर क्लिक करून नोंदणी करू शकता.
वाचा-तुमच्याकडेही आहेत PPF ची एकापेक्षा अधिक खाती? या सोप्या पद्धतीनं करा विलीन
कुणाला सुविधा मिळणार नाहीत
ही सुविधा जॉइंट अकाउंट, मायनर अकाउंट तसंच वैयक्तिक नसलेल्या खातेधारकांना दिली जाणार नाही. दरम्यान ज्या ग्राहकांचा नोंदणीकृत पत्ता गृह शाखेच्या 5 किमीच्या परिघात आहे, त्यांनाच ही सुविधा मिळेल.
तुम्ही या क्रमांकावर देखील करू शकता संपर्क
बँकेच्या मोबाईल अॅप्लिकेशन, वेबसाइट किंवा कॉल सेंटर द्वारे डोअरस्टेप बँकिंग सेवेसाठी नोंदणी करता येते. याशिवाय 1800111103 या टोल फ्री क्रमांकावर सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत कॉल करता येईल. एसबीआय डोअरस्टेप बँकिंग सेवांबद्दल अधिक माहितीसाठी, ग्राहक https://bank.sbi/dsb ला भेट देऊ शकतात. ग्राहक बँकेच्या गृह शाखेशीही संपर्क साधू शकतात.
वाचा-Gold Price Today: सोन्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ, 60000 रुपयांवर पोहोचणार भाव
डोअरस्टेप बँकिंगची वैशिष्ट्ये
1. यासाठी नोंदणी होम ब्रँचमध्ये करावी लागेल.
2. जोपर्यंत ही सुविधा संपर्क केंद्रावर पूर्ण होत नाही, तोपर्यंत होम ब्रँचमध्येच अर्ज करावा लागेल.
3. पैसे जमा करणे आणि काढणे या दोन्हीसाठी कमाल मर्यादा 20 हजार रुपये प्रतिदिन आहे.
4. सर्व गैरआर्थिक व्यवहारासाठी सेवा शुल्क 60 + जीएसटी आहे तर आर्थिक व्यवहारासाठी ते 100 + जीएसटी आहे.
5. पैसे काढण्यासाठी, चेक आणि पैसे काढण्याच्या फॉर्मसह, पासबुक देखील आवश्यक असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.