मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुमच्याकडेही आहेत PPF ची एकापेक्षा अधिक खाती? या सोप्या पद्धतीनं करा विलीन

तुमच्याकडेही आहेत PPF ची एकापेक्षा अधिक खाती? या सोप्या पद्धतीनं करा विलीन

पीपीएफच्या नियमानुसार, एक व्यक्ती एकापेक्षा जास्त PPF खाती (Not More than one PPF Account) उघडू शकत नाही. परंतु अनेकदा लोक अनवधानाने एकापेक्षा जास्त PPF खाती उघडतात. अशावेळी ही एकापेक्षा जास्त खाती विलीन (Merge) करून एक खातं सुरू ठेवण्याची सुविधा पोस्ट खात्याने दिली आहे.

पीपीएफच्या नियमानुसार, एक व्यक्ती एकापेक्षा जास्त PPF खाती (Not More than one PPF Account) उघडू शकत नाही. परंतु अनेकदा लोक अनवधानाने एकापेक्षा जास्त PPF खाती उघडतात. अशावेळी ही एकापेक्षा जास्त खाती विलीन (Merge) करून एक खातं सुरू ठेवण्याची सुविधा पोस्ट खात्याने दिली आहे.

पीपीएफच्या नियमानुसार, एक व्यक्ती एकापेक्षा जास्त PPF खाती (Not More than one PPF Account) उघडू शकत नाही. परंतु अनेकदा लोक अनवधानाने एकापेक्षा जास्त PPF खाती उघडतात. अशावेळी ही एकापेक्षा जास्त खाती विलीन (Merge) करून एक खातं सुरू ठेवण्याची सुविधा पोस्ट खात्याने दिली आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : भारत सरकारची (Indian Government) पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही योजना उत्तम व्याजदरामुळे (High Interest rates) आणि सुरक्षिततेमुळे (Security) सर्वसासामान्य गुंतवणूकदारांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. बँका आणि भारतीय पोस्टात (Indian Post Department) या योजनेसाठी खातं उघडता येतं. या योजनेतील गुंतवणुकीला कर बचातीचाही (Tax Benefit) फायदा मिळतो. पूर्वी फक्त पोस्टात हे खातं उघडण्याची सुविधा होती आता सरकारी बँकांमध्येदेखील PPF खाते उघडता येते. त्यामुळे PPF मध्ये गुंतवणूक करणं आणखी सोपं झाले आहे. पीपीएफच्या नियमानुसार, एक व्यक्ती एकापेक्षा जास्त PPF खाती (Not More than one PPF Account) उघडू शकत नाही. परंतु अनेकदा लोक अनवधानाने एकापेक्षा जास्त PPF खाती उघडतात. दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये (Bank) किंवा पोस्ट ऑफिसमध्ये (Post) किंवा एक बँकेत आणि एक पोस्टात अशी खाती उघडली जातात. अशावेळी ही एकापेक्षा जास्त खाती विलीन (Merge) करून एक खातं सुरू ठेवण्याची सुविधा पोस्ट खात्याने दिली आहे. PPF खाती विलीन करण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती देणारं एक परिपत्रक पोस्ट खात्याने 18 ऑक्टोबर 2021 रोजी जारी केलं असून, त्या आधारे ही प्रक्रिया करून नियमबाह्य एकापेक्षा अधिक PPF खाती बंद करून एक खातं सुरू ठेवता येतं. यामध्ये ज्या व्यक्तीची एकापेक्षा जास्त खाती असतील त्या व्यक्तीला जे खातं हवं आहे, ते सुरू ठेवण्याचा पर्याय असेल. दोन्ही खात्यांमध्ये एकत्र ठेवलेल्या ठेवी विहित ठेव मर्यादेत असतील (सध्या ती प्रति आर्थिक वर्ष 1.5 लाख रुपये आहे) आणि ही खाती एकाच ऑपरेटिंग एजन्सीमध्ये म्हणजे एकाच बँकेत किंवा एकाच पोस्ट ऑफिसच्या शाखेत असतील तर ती सहजपणे विलीन करून एक करता येतात. समजा एक PPF खातं बँकेत आणि एक पोस्टात असेल तर खातेधारकाला जे खातं सुरू ठेवायचं आहे, तिथं दुसरं खातं विलीन करून घेण्याबाबत अर्ज करावा लागेल. अर्ज करताना त्या खात्याचं पासबुक (Passbook) किंवा खात्याच्या स्टेटमेंटची फोटोकॉपी देणं आवश्यक आहे. त्यानंतर याबाबतची माहिती जिथलं खातं विलीन करायचं आहे त्या बँकेला किंवा पोस्टाला दिली जाईल. जिथे PPF खातं कायम ठेवायचं आहे, तिथं खातेधारकाने सर्व खात्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा आढावा घेऊन खात्यातील ठेवी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त नसल्याची खात्री करून घेतली जाईल आणि त्यानंतर जिथले खाते बंद करायचे आहे, त्या कार्यालयाला तिथले खाते बंद करून त्यातील शिल्लक हस्तांतरित करण्याची सूचना केली जाईल. ठेवी मर्यादेपेक्षा जास्त असल्यास निर्धारित मर्यादेच्या पलीकडील रक्कम खातेधारकाला कोणत्याही व्याजाशिवाय परत केली जाईल. तर मर्यादेच्या आतील रकमेवर व्याज देऊन ती शिल्लक हस्तांतरित केली जाईल.

PPF वरील व्याजदर किती असावा? काय आहे RBI चं म्हणणं

समजा, एखाद्या व्यक्तीकडे दोन PPF खाती आहेत. एक खाते 4 एप्रिल 2018 रोजी उघडण्यात आलं, तर दुसरं खातं 4 एप्रिल 2020 रोजी उघडलं गेलं. 4 एप्रिल 2018 रोजी उघडलेल्या खात्यात 1.5 लाख रुपये ठेवण्यात आले. त्यानंतर 3 एप्रिल 2019 मध्ये 1.20 लाख रुपये भरण्यात आले आणि त्यानंतर 3 एप्रिल 2020 ला 1.40 लाख भरण्यात आले. त्यानंतर 5 एप्रिल 2021रोजी 1 लाख रुपये भरण्यात आले. पीपीएफचा व्याजदर 7 टक्के गृहीत धरला तर या रकमेवर व्याज धरून 5 एप्रिल 2021 अखेर या खात्यात 5 लाख 70 हजार 944 रुपये जमा आहेत. आता दुसरं खातं जे 4 एप्रिल 2020 रोजी उघडण्यात आलं आहे. त्यात खातं उघडताना 20 हजार रुपये भरण्यात आले आहेत. तर त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये 40 हजार रुपये आणि 9 एप्रिल 2021 रोजी दहा हजार रुपये भरण्यात आले. मिळालेल्या व्याजासह या खात्यात 72 हजार 800 रुपये शिल्लक आहेत. ही दोन्ही खाती विलीन करून एकच खाते सुरू करताना पहिले म्हणजे 2018 मध्ये जिथे खातं उघडलं आहे ते कायम ठेवायचं असल्यास त्यात दुसऱ्या खात्यातील रक्कम जमा केली जाईल. मात्र दोन्ही खात्यांची एकत्रित रक्कम दर वर्षी दीड लाख या मर्यादेपेक्षा अधिक होत असल्याने अतिरिक्त असलेले 50 हजार खातेधारकाला परत दिले जातील आणि 2100 रुपये व्याज कापले जाईल. या खात्यात 5 एप्रिल 2021 अखेर 5 लाख 91 हजार 644 रुपये जमा असतील. समजा, खातेधारकाला 4 एप्रिल 2020 रोजी सुरू केलेलं खाते पुढे सुरू ठेवायचं असेल, तर 2018 मध्ये उघडलेलं खातं विलीन केलं जाईल. अशावेळी आधीच्या खात्यातील 4 एप्रिलपर्यंत भरलेली 4 लाख 40 हजार 135 इतकी रक्कम हस्तांतरित केली जाईल. त्यानंतर चालू खात्यातील 4 एप्रिलला जमा केलेली 10 हजार रुपयांची रक्कमही खात्यात धरली जाईल. त्यावर व्याज दिले जाईल. त्यानंतर एप्रिल 2021मध्ये विलीन केलेल्या खात्यातील एक लाख रुपयांची रक्कम आणि चालू खात्यातील 10 हजार रुपये या खात्यात ठेवले जातील. अशाप्रकारे दुसरे खाते सुरू ठेवल्यास 5 एप्रिल 2021 अखेर या खात्यात 5 लाख 91 हजार 644 रुपये जमा असतील.

EPFO: PF Account चे हे 6 फायदे तुम्हाला माहित आहेत का? सहज मिळवता येईल लाभ

म्हणजेच पहिले खाते सुरू ठेवल्यास खातेधारकाला 50 हजार परत दिले जातील आणि 2100 रुपये व्याज कापले जाईल आणि दुसरे खाते सुरू ठेवल्यास काहीही रक्कम परत मिळणार नाही आणि व्याजही कापले जाणार नाही. कोणतेही खाते सुरू ठेवले तरी दोन्हीकडे शिल्लक समान असेल. याआधारे खातेदार कोणते खाते कोणत्या खात्यात विलीन करणे फायदयाचे आहे याचा निर्णय घेऊ शकतील.
First published:

Tags: Open ppf account, PPF

पुढील बातम्या