Home /News /money /

Gold Price Today: सोन्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ, 60000 रुपयांवर पोहोचणार भाव!

Gold Price Today: सोन्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ, 60000 रुपयांवर पोहोचणार भाव!

सणासुदीच्या काळात आज सोनेखरेदी महागली आहे. सोन्याच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही (Gold silver price) आज वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते दिवाळी ते डिसेंबर पर्यंत सोन्याची किंमत 57 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 ऑक्टोबर: सणासुदीच्या काळात आज सोनेखरेदी महागली आहे. सोन्याच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही (Gold silver price) आज वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर प्रति तोळा सोन्याची किंमत (Gold price today) 44 रुपयांनी म्हणजेच 0.09 टक्के वाढली आहे. या वाढीनंतर आज सोने प्रति तोळा 47,543 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी (silver price today) आज 174 रु. अर्थात  0.27% वाढीसह 65,781 रुपयांवर व्यवहार करत आहे. 60000 रुपयांवर पोहोचणार सोन्याचा भाव तज्ज्ञांच्या मते दिवाळी ते डिसेंबर पर्यंत सोन्याची किंमत 57 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर 76,000 ते 82,000 रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकतात. वाचा-PPF वरील व्याजदर किती असावा? काय आहे RBI चं म्हणणं मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. वाचा-EPFO: PF Account चे हे 6 फायदे तुम्हाला माहित आहेत का? सहज मिळवता येईल लाभ अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या