मुंबई, 25 जून: कोरोना काळात (Coronavirus in India) ऑनलाइन व्यवहार, ऑनलाइन अपिअरन्स वाढला असला तरी या काळात ऑनलाइन फ्रॉड देखील वाढले आहेत. या काळात सायबर क्राइमची (Cyber Crime) प्रकरणं वाढल्याने विविध बँका त्यांच्या ग्राहकांना याबाबत अलर्ट पाठवत असतात. देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील सायबर क्राइमपासून वाचण्यासाठी ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. SBI ने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम (Vaccination Drive in India) सुरू आहे. अशावेळी व्हॅक्सिन घेतल्यानंतर फोटो टाकण्याचा नवा ट्रेंडही सुरू आहे. काहीजणं थेट त्यांचं व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करत आहेत. तुम्ही पण जर असं केलं असेल तर सावधान! कारण या प्रमाणपत्रामध्ये तुमची वैयक्तिक माहिती असते. तिचा वापर करून तुम्ही सायबर क्राइमचे शिकार बनू शकता. एसबीआयने सायबर क्राइमपासून बचाव करण्यासाठी टीप्स देताना हा मुद्दा देखील मांडला आहे.
हे वाचा-गुगल क्लाउड आणि रिलायन्स जिओमध्ये नवी 5G भागीदारी; मिळेल वेगवान इंटरनेट सेवा
काय आहे ट्वीट?
SBI ने काही पॉइंटर्सचा एक व्हिडीओ जारी केला आहे. त्याला कॅप्शन देताना बँकेनं असं म्हटलं आहे की, 'नेहमी लक्षात ठेवा की तुमची वैयक्तिक माहिती खाजगी ठेवणं गरजेचं आहे. सायबर क्राइमच्या घटना टाळण्यासाठी या काही टीप्सकडे लक्ष द्या'. अशाप्रकारे कोणती घटना घडल्यास रिपोर्ट करण्यासाठी बँकेने cybercrime.gov.in या लिंकवर क्लिक करण्याचा सल्ला दिला आहे.
Always remember that your personal information needs to be kept private. Pay attention to these important safety tips to avoid cybercrime.
Click here to report any such incident at https://t.co/3Dh42iwLvh #SBI #StaySafe #StayVigilant #SafetyTips #OnlineSafety pic.twitter.com/BMVkZlSZIB — State Bank of India (@TheOfficialSBI) June 24, 2021
सायबर क्राइमपासून वाचण्यासाठी SBI च्या टिप्स
-शेअरिंग इज नॉट केअरिंग अशा टायटलखाली एसबीआयने काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
-सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका
हे वाचा-गोव्याचा प्लॅन रद्दच करावा लागणार! कोरोनामुळे घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय
-व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट किंवा इतर कागदपत्र, ज्यामध्ये वैयक्तिक माहिती असेल ते कुठेही शेअर करू नका
-सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय कुणालाही पैसे ट्रान्सफर करू नका
-असत्यापित (Unverified) लिंक्सवर किंवा संशयास्पद मेलवर क्लिक करू नका
-कुणाबरोबरही डेबिट कार्ड डिटेल्स/INB क्रेडेन्शिअल्स इ. शेअर करू नका
-चुकीची माहिती आणि खोट्या मेसेजेसपासून सावध राहा
-
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SBI, Sbi account, Sbi ATM, SBI bank