नवी दिल्ली, 24 जून: रिलायन्स इंडस्ट्रीजची (Reliance Industries) 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज, 24 जून रोजी दुपारी दोन वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी या वेळी तीन कोटींहून अधिक शेअरधारकांशी (Shareholders) संवाद साधला. गुगल क्लाउड (Google Cloud) आणि जिओ (Reliance Jio) यांच्यात 5G साठी भागीदारी होणार असल्याची घोषणा अंबानी यांनी यावेळी केली.
गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनीही म्हटलं आहे, की गुगल क्लाउड आणि जिओ यांच्यात 5G साठी झालेल्या नव्या भागीदारीमुळे एक अब्जाहून अधिक भारतीयांना वेगवान इंटरनेट सेवा मिळणार आहे. त्याच्या साह्याने आपल्या उद्योग-व्यवसायांचं डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशन (Digital Transformation) करणं लोकांना शक्य होईल आणि डिजिटायझेशनचा (Digitisation) नवा टप्पा देशात दिसून येईल.
पिचाई पुढे म्हणाले, की या भागीदारीअंतर्गत रिलायन्स आपल्या मुख्य रिटेल बिझनेससाठी गुगल क्लाउडच्या पायाभूत सुविधा (Infrastructure) वापरेल. त्यामुळे त्यांना गुगलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence), मशीन लर्निंग (Machine Learning), ई-कॉमर्स (E-Commerce) आणि डिमांड फोरकास्टिंग (Demand Forecasting) यांसारख्या सुविधांचा लाभ त्यांना मिळेल.
हे वाचा-5G फोन, पाउण लाख जॉब्ज... Reliance च्या AGM मध्ये झाल्या 10 मोठ्या घोषणा
ते पुढे म्हणाले की, गुगल क्लाउडच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे जिओच्या 5G सोल्युशन्सला ताकद तर मिळेलच; शिवाय रिलायन्स रिटेल, जिओमार्ट, जिओ सावन, जिओ हेल्थ अशा रिलायन्सच्या बाकीच्या उद्योगांच्या गरजाही पूर्ण होतील.
भारतात 5G ची सुरुवात रिलायन्स जिओच करील, अशी ग्वाही मुकेश अंबानी यांनी या सर्वसाधारण सभेत दिली. रिलायन्स जिओने अत्याधुनिक स्टँडअलोन 5G तंत्रज्ञान विकसित करण्यात यश मिळवलं आहे. वायरलेस ब्रॉडबँड क्षेत्रातली ही मोठी झेप आहे, असं त्यांनी सांगितलं. 5Gच्या चाचण्यांदरम्यांन जिओच्या नेटवर्कचा स्पीड 1GBPSपेक्षाही अधिक असल्याचं आढळलं आहे. त्यामुळे जिओची मेड इन इंडिया सोल्युशन्स जागतिक पातळीवरची आहेत, असा विश्वासही मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.
हे वाचा-सौरऊर्जेबाबत Relianceचं मोठं पाऊल, मोदींचं हे लक्ष्य साध्य करण्यासाठी निर्णय
दरम्यान, रिलायन्स जिओने भारतातील सर्वांत स्वस्त 5G स्मार्टफोन सादर करणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या गणेश चतुर्थीदिवशी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी हा स्मार्टफोन सादर केला जाणार आहे. हा 5G स्मार्टफोन जिओ आणि गुगलने यांनी संयुक्तरीत्या विकसित केला आहे. या फोनमध्ये कस्टम अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असेल, असं सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mukesh ambani, Reliance, Reliance group, Reliance Industries, Reliance Industries Limited, Reliance Jio, Reliance Jio Internet