मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कोट्यवधी ग्राहकांना SBI चा झटका! एफडी व्याजदरात मोठी कपात, वाचा काय आहेत नवे दर

कोट्यवधी ग्राहकांना SBI चा झटका! एफडी व्याजदरात मोठी कपात, वाचा काय आहेत नवे दर

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) एफडीवरील व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) एफडीवरील व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) एफडीवरील व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला आहे.

    नवी दिल्ली, 27 मे : देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) एफडीवरील व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने एफडी दरामध्ये 0.40 टक्क्याने कपात केली आहे. एसबीआयचे नवीन एफडी दर ((SBI FD New Rates 2020) 27 मे म्हणजेच आजपासून लागू करण्यात येत आहेत. बँकेने या महिन्याच्या सुरूवातीला देखील एफडीवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. काय आहेत एसबीआयचे नवीन एफडी व्याजदर एसबीआयने व्याजदरामध्ये कपात केल्यानंतर आतापासून 1 ते 2 वर्षांच्या एफडीवरील व्याजदर कमी होऊन 5.1 टक्क्यावर पोहोचला आहे. तर 3 ते 5 वर्षांपर्यंत असणाऱ्या एफडीवरील व्याजदर 5.3 टक्के असणार आहे. 1) 7 ते 45 दिवसांसाठी असणाऱ्या एफडीवरील नवीन व्याजदर- या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी व्याजदर 3.3 टक्क्यांवरून 2.9 टक्के करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 3.8 टक्क्यांवरून 3.4 टक्के करण्याात आला आहे. (हे वाचा-लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या किंमती उतरल्या, जाणून घ्या काय आहेत बुधवारचे दर) 2) 46-179 दिवसांच्या एफडीवरील नवीन व्याजदर- या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी व्याजदर 4.3 टक्क्यांवरून 3.9 टक्के करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 4.8 टक्क्यांवरून 4.4 टक्के करण्याात आला आहे. 3) 18-210 दिवसांच्या एफडीवरील नवीन व्याजदर- या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी व्याजदर 4.8 टक्क्यांवरून 4.4 टक्के करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 5.3 टक्क्यांवरून 4.9 टक्के करण्याात आला आहे. 4) 211 दिवस ते 1 वर्षाच्या एफडीवरील नवीन व्याजदर- या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी व्याजदर 4.8 टक्क्यांवरून 4.4 टक्के करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 5.3 टक्क्यांवरून 4.9 टक्के करण्याात आला आहे. (हे वाचा-मुंबईसह पुणे शहर 10 दिवस बंद राहणार, आर्मी तैनात होणार? काय म्हणाले गृहमंत्री) 5) 1 ते 2 वर्षाच्या एफडीवरील नवीन व्याजदर- या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी व्याजदर 5.5 टक्क्यांवरून 5.1 टक्के करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 6 टक्क्यांवरून 5.6 टक्के करण्याात आला आहे. 6) 2 ते 3 वर्षासाठी असणाऱ्या एफडीवरील नवीन व्याजदर- या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी व्याजदर 5.5 टक्क्यांवरून 5.1 टक्के करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 6 टक्क्यांवरून 5.6 टक्के करण्याात आला आहे. 7) 3 ते 5 वर्षासाठी असणाऱ्या एफडीवरील नवीन व्याजदर- या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी व्याजदर 5.7 टक्क्यांवरून 5.3 टक्के करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 6.2 टक्क्यांवरून 5.8 टक्के करण्याात आला आहे. 8) 5 ते 10 वर्षासाठी असणाऱ्या एफडीवरील नवीन व्याजदर- या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी व्याजदर 5.7 टक्क्यांवरून 5.4 टक्के करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 6.5 टक्क्यांवरून 6.2 टक्के करण्याात आला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: SBI

    पुढील बातम्या