लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या किंमती उतरल्या, जाणून घ्या काय आहेत बुधवारचे दर

लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या किंमती उतरल्या, जाणून घ्या काय आहेत बुधवारचे दर

देशांतर्गत बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोने खरेदी (Gold-Silver Price Today 27th May 2020) स्वस्त झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मे : देशांतर्गत बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोने खरेदी  (Gold-Silver Price Today 27th May 2020) स्वस्त झाली आहे. मे मध्ये 47,980 रुपयांचा रेकॉर्ड बनवल्यानंतर देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती घसरून बुधवारी 46799 रुपये प्रति तोळा या किंमतीवर पोहोचल्या आहेत. मंगळवारी 24 कॅरेट म्हणजेच गोल्ड 999 चे भाव शुक्रवारपेक्षा 301 रुपयांनी कमी झाले होते. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर (ibjarates.com) सोन्याच्या सरासरी किंमती अपडेट होत असतात.

सोनं स्वस्त होण्याची कारणं

तज्ज्ञांच्या मते सध्या जगभरात आणि देशातील काही भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बंद असणारे व्यवहार पु्न्हा एकदा सुरू झाले आहेत. परिणामी शेअर बाजारात पुन्हा एकदा व्यवहार सुरू झाले आहेत.

(हे वाचा-विमान प्रवास करायचाय? 14 दिवस क्वारंटाइन झालं बंधनकारक; हे आहेत नवे नियम)

त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे वळवलेला मोर्चा पुन्हा एकदा इतर पर्यायांकडे वळवला आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरून 1710 डॉलर प्रति औंस इतक्या झाल्या आहे. गेल्या दोन आठवड्यातील हा सर्वात कमी स्तर आहे.

भविष्यात काय राहणार सोन्याच्या किंमती?

जगभरात झालेल्या अनेक रिसर्च अहवालांच्या मते सोन्यामध्ये पुढील काही महिन्यामध्ये गुंतवणूक कायम राहील. पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याची किंमत 54000 रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

सोनं खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

1. सोन्याच्या शुद्धतेनुसार सोन्याचे दागिने सुद्धा वेगवेगळ्या कॅरेटमध्ये येतात. 24 कॅरेट सोनं सगळ्यात शुद्ध सोनं असतं. 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांमध्ये 91.6 टक्के सोन्याची शुद्धता असते.

(हे वाचा-काँग्रेस नेत्या अलका लांबा यांच्या अडचणीत वाढ, उन्नावनंतर लखनऊमध्ये FIR दाखल)

2. सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती दोन गोष्टींवरून ठरतात- एक म्हणजे दागिन्यामध्ये सोन्याचा हिस्सा काय आहे. उदा. 22 कॅरेट की 18 कॅरेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दागिने बनवण्यासाठी सोन्यामध्ये मिसळण्यात येणारा धातू.

First published: May 27, 2020, 1:56 PM IST

ताज्या बातम्या