• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • SBI Alert! 46 कोटी ग्राहकांनी त्वरित हे काम करणं आवश्यक, अन्यथा करता येणार नाहीत ट्रान्झॅक्शन

SBI Alert! 46 कोटी ग्राहकांनी त्वरित हे काम करणं आवश्यक, अन्यथा करता येणार नाहीत ट्रान्झॅक्शन

State Bank Of India: तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे

  • Share this:
    नवी दिल्ली, 01 ऑगस्ट: जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank Of India) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. एसबीआयने त्यांच्या 46 कोटी ग्राहकांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. एसबीआयने त्यांच्या खातेधारकांना (SBI account holder) लवकरात लवकर त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक (PAN-Aadhaar card Link) करा. बँकेच्या मते, जर ग्राहकाने हे काम निश्चित सीमेपर्यंत पूर्ण नाही केले तर त्यांच्या बँकिंग सेवेवर परिणाम होऊ शकतो. सरकारकडून पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करणं (PAN-Aadhaar linking) अनिवार्य करण्यात आलं आहे. सध्या पॅन-आधार लिंक करण्याची तारीख 30 सप्टेंबर आहे. अशावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील पॅन आणि आधार लवकरात लवकर लिंक करण्याचं आवाहन केलं आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या खातेधारकांची संख्या 46 कोटीवर पोहोचली आहे. या ग्राहकांनी पॅन-आधार लिंक केले नाही तर त्यांच्या बँकिंग सेवा बाधित होऊ शकतात. हे वाचा-महिन्याच्या पहिल्या दिवशी सामान्यांना दिलासा, तपासा 1 लीटर पेट्रोलचे दर बँकेने काय म्हटलं? ट्वीट करत बँकेने अशी माहिती दिली आहे की, पॅन आधार लिंक करणं अनिवार्य आहे. असे न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि ट्रान्झॅक्शनसाठी कोट करता येणार नाही. तुम्ही www.incometax.gov.in वर भेट देऊन Link Aadhaar वर क्लिक करुन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. याकरता डेडलाइन 30 सप्टेंबर आहे. कोणतीही असुविधा टाळण्यासाठी लवकरात लवकर हे काम पूर्ण करा. हे वाचा-Aadhaar Alert! तुमच्या मुलाचं आधार कार्ड होऊ शकतं निष्क्रिय, त्वरित करा अपडेट पॅन आणि आधार कार्ड लिंक न झाल्यास डेडलाइननंतर तुमच्या चालू सेवा प्रभावित होऊ शकतात. तुमच्या खात्यावर याचा परिणाम होऊ शकतो. ऑनलाइन करता येईल लिंक तुम्ही इन्कम टॅक्सच्या नवीन वेबसाइटच्या आधारे माहित करुन घेऊ शकता की तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही. जाणून घेण्याकरता इन्कम टॅक्स वेबसाइटवर जा, त्याठिकाणी आधार कार्डावरील नाव, तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा. आधार कार्डवर केवळ जन्माचं वर्ष असेल तर तसा पर्याय निवडा. कॅप्चा टाकून लिंक आधारवर क्लिक करा. अशाप्रकारे सोप्या पद्धतीने तुमचं आधार पॅन कार्डशी लिंक होईल. SMS च्या माध्यमातून पॅन-आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला UIDPAN<स्पेस>12 अंकी आधार क्रमांक<स्पेस>10 अंकी पॅन कार्ड क्रमांक टाइप करुन 567678 किंवा 56161 या क्रमांकांवर पाठवावा लागेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: