मुंबई, 01 ऑगस्ट: आधार कार्ड (Aadhaar Card) हा सध्याच्या काळात एक महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे. केवळ प्रौढांसाठीच नव्हे तर लहान मुलांसाठी (Aadhaar Card of Child) देखील आधार महत्त्वाचे आहे. UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, आता अगदी नवजात बालकाचेही आधार कार्ड बनवण्याची सोय आहे. नवजात बालक ते 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचे आधार कार्ड बनवताना त्यांची बायोमेट्रिक माहिती घेतली जात नाही. बाळाचा जन्मदाखला किंवा हॉस्पिटलमधील डिस्चार्ज सर्टिफिकेट आणि आई-वडिलांचं आधार कार्ड या कागदपत्रांच्या आधारे नवजात बालकाचे आधार कार्ड बनवता येतं. त्याकरता बायोमेट्रिक माहितीची आवश्यकता नसते, मात्र मुल पाच वर्षाचे झाल्यानंतर बायोमेट्रिक माहिती गरजेची आहे. अन्यथा तुमच्या मुलाचं आधार कार्ड निष्क्रिय होईल. आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI ने याबाबत ट्वीट जारी करत माहिती दिली आहे नवजात बाळाच्या आधारचा वापर केवळ पाच वर्षांपर्यंत करता येऊ शकतो. पाच वर्षानंतर बायोमेट्रिक तपशील अपडेट केला नाही तर मुलाचं आधार निष्क्रिय होईल. हे वाचा- तुमच्या जीवनावर थेट परिणाम करणारे हे 7 नियम बदलणार, उद्यापासून लागू होणार बदल अशाप्रकारे करा आधार अपडेट UIDAI च्या मते मुलाच्या वयाची पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर बायोमेट्रिक डिटेल्स अपडेट करण्यासाठी तुम्हाला जवळचा आधार सेंटरवर जावे लागेल. हे बायोमेट्रिक अपडेट करणं अनिवार्य आहे. दरम्यान याकरता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आधार सेंटरवर अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्हाला UIDAI ची वेबसाइट https://appointments.uidai.gov.in/easearch.aspx वर भेट द्यावी लागेल. त्यानंतर अपडेशनसाठी दिलेल्या वेळेत जाऊन तुम्ही बायोमेट्रिक तपशील अपडेट करू शकता. वयाच्या पाचव्या वर्षी बायोमेट्रिक तपशील अपडेट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाचे ही माहिती पुन्हा वयाच्या पंधराव्या वर्षी अपडेट करणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.