मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol-Diesel Price Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सामान्यांना दिलासा, तपासा 1 लीटर पेट्रोलचे दर

Petrol-Diesel Price Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सामान्यांना दिलासा, तपासा 1 लीटर पेट्रोलचे दर

Petrol-Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी सलग 15व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही आहे. त्यामुळे इंधन दरवाढीपासून सामान्यांना आजही काहीसा दिलासा मिळाला आहे.

Petrol-Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी सलग 15व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही आहे. त्यामुळे इंधन दरवाढीपासून सामान्यांना आजही काहीसा दिलासा मिळाला आहे.

Petrol-Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी सलग 15व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही आहे. त्यामुळे इंधन दरवाढीपासून सामान्यांना आजही काहीसा दिलासा मिळाला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 01 ऑगस्ट: कोरोना काळात एकीकडे सामान्य माणूस आर्थिक संकटांचा सामना करत आहे, तर दुसरीकडे महागाई देखील वाढत आहे. आवश्यक असणाऱ्या विविध गोष्टी महाग होत चालल्या आहेत. पेट्रोल-डिझेलचे भावही गगनाला भिडले आहेत, याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर देखील होतो आहे. दरम्यान पेट्रोलचे दर सर्वाधिक पातळीवर असले तरी गेल्या पंधरा दिवसांपासून दर स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी सलग 15व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price Today) कोणताही बदल केला नाही आहे. त्यामुळे इंधन दरवाढीपासून सामान्यांना आजही काहीसा दिलासा मिळाला आहे. देशाची राजधानी दिल्लीसह अनेक शहरात आजही दर स्थिर आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर (Petrol Price in Mumbai) 107.83 रुपये आहेत तर डिझेल (Diesel Price in Mumbai) 97.45 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे.

हे वाचा-आजपासून Post Office च्या या नियमात बदल, प्रत्येक रिक्वेस्टवर द्यावे लागणार 20 रु

मे महिन्यानंतर सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ पाहायला मिळते आहे. 42 दिवसात पेट्रोलचे दर 11.52 रुपये प्रति लीटरने महागले होते. शिवाय डिझेलचे दर सोमवारी काहीसे कमी झाले होते. 15 जुलै रोजी डिझेलच्या किंमतीत वाढ झाली होती.

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

>> दिल्ली - पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटर

>> मुंबई - पेट्रोल 107.83 रुपये और डीजल 97.45 रुपये प्रति लीटर

>> चेन्नई - पेट्रोल 101.49 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लीटर

>> कोलकाता - पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लीटर

>> भोपाळ - पेट्रोल 110.20 रुपये आणि डिझेल 98.67 रुपये प्रति लीटर

>> बंगळुरु - पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लीटर

>> लखनऊ -पेट्रोल 98.69 रुपये आणि डिझेल 90.26 रुपये प्रति लीटर

>> पाटणा - पेट्रोल 104.25 रुपये आणि डिझेल 95.57 रुपये प्रति लीटर

>> जयपूर - पेट्रोल 108.71 रुपये आणि डिझेल 99.02 रुपये प्रति लीटर

>> गुरुग्राम - पेट्रोल 99.46 रुपये आणि डिझेल 90.47 रुपये प्रति लीटर

हे वाचा-या 7 बदलांचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम, आजपासून होतायंत हे नियम लागू

19 राज्यात दर आहेत शंभरीपार

देशभरातील एकूण 19 राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पार आहेत. या यादीमध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाख इ. चा समावेश आहे. याशिवाय महानगरांमध्ये  मुंबई, हैदराबाद, बंगलूरुने आधीच शंभरी पार केली आहे.

असे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

First published:

Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise