मुंबई, 11 मार्च : एकीकडे देशात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असताना आता (SBI) च्या ग्राहकांनाही बँकेने जोरदार झटका दिला आहे. बँकेत मुदत ठेवी असणाऱ्या ग्राहकांचं या नव्या निर्णयामुळे नुकसान होणार आहे. भारतीय स्टेट बँकेने (SBI) फिक्स्ड डिपॉझिटच्या (FD) व्याजदरात कपात केली आहे. महिन्याभरात भारतीय स्टेट बँकेने दुसऱ्यांदा व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे SBI ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे.
(SBI)च्या नव्या व्याजदरानुसार बँकेने शॉर्ट टर्म अर्थात 45 दिवसांच्या FD वर 0.50 टक्के कपात केली आहेत. हा नियम 10 मार्चपासून लागू करण्यता आलेला आहे. दरम्यान नव्या व्याजदरानुसार 7 ते 45 दिवसांच्या मुदत ठेवीवर (FD) वर 4 टक्के व्याज मिळणार आहे. यापूर्वी ते 4.50 टक्के इतकं होतं. याबरोबरच 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठीच्या FD वर व्याजदारामध्ये 0.10 टक्क्याने घट झाली आहे. या रकमेवर पूर्वी 6 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत होतं.
फेब्रुवारीमध्येही व्याजदरात झाली होती घट
फेब्रुवारी महिन्यात भारतीय स्टेट बँकेने (SBI) एफडीच्या दरात 10 ते 15 बीपीएस इतकी कपात केली होती. दरम्यान, बँकेने 46 ते 179 दिवस आणि 180 ते 210 दिवस आणि 211 दिवस ते एक वर्ष इतक्या काळासाठी (FD) च्या व्याजदरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.
वाचा - येस बँक प्रकरणात मलायकाच्या बॉयफ्रेंडचं नाव, म्हणे 'अर्जुन कपूरमुळे बुडली बँक'
तर यासोबतच भारतीय स्टेट बँकेने (SBI) MCLR मध्ये सुद्धा 15 बीपीएसची कपात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगलाच फटका बसलेला आहे.
वरिष्ठ नागरिकांसाठी काय आहेत व्याजदर
वरिष्ठ नागरिकांसाठी (SBI FD rates for Senior Citizens) चा विचार केला तर नव्या कपातीनंतर आता 46 दिवस ते 179 दिवसापर्यंतच्या (FD) वर 5.50 % पर्यंत व्याज मिळू शकणार आहे. तर 180 से 210 दिवसांच्या FDवर वरिष्ठ नागरिकांसाठी व्याजदार हा 6 टक्के असेल. दुसरीकडे 211 दिवस ते 1 वर्षापर्यंतच्या ठेवीसाठी व्याजदर 6 टक्केच असेल. तर सिनिअर सिटिझनसाठी 1, 2 आणि 3 ते 5 आणि 10 वर्षाच्या ठेवीवर 6.40 टक्के दरानेच व्याज मिळणार आहे.
वाचा - आता तुमच्या बॅंक चेकमध्ये होणार मोठा बदल, RBI आणणार नवीन सिस्टम
त्यामुळे एकंदरितच आता भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) व्याजदरात कपात झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर तयार झाला आहे. सर्वसाधारण लोक आपल्या मेहनतीने जमा केलेले पैसे सुरक्षित राहण्यासाठी बँकेत जमा ठेवत असतात. यामागे त्यांचा दुसरा उद्देश पैशांमध्ये व्याजरुपी वाढ होऊन ठेवीची रक्कम वाढावी हा सुद्धा असतो. त्यामुळे लोकांचा आपल्या बँकेवर अधिक विश्वास तयार झालेला असतो. पण आता फेब्रुवारीपाठोपाठ पुन्हा एकदा व्याजाच्या दारात कपात केली गेली आहे. त्यामुळे सहाजिकच (SBI)चे ग्राहक बँकेवर काही प्रमाणात नाराज होऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.