वाहनधारकांसाठी मोठी खूशखबर! पेट्रोल प्रतिलीटर 50 रुपये दराने मिळणार

वाहनधारकांसाठी मोठी खूशखबर! पेट्रोल प्रतिलीटर 50 रुपये दराने मिळणार

गेल्या 9 महिन्यांत पहिल्यांदाच सोमवारी पेट्रोलचे दर कमी झाले. हे दर 50 रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 मार्च : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराने हैराण झालेल्या वाहनधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात कच्च्या तेलांच्या किमतीवरून सुरु झालेल्या युद्धाचा फायदा होऊ शकतो. पेट्रोलचे दर प्रतिलिटर 50 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. सरकारचा आयात खर्च कमी होईल आणि कच्चे तेलही स्वस्तात मिळण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सध्या 31 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. सौदी अरेबियाने दरात केलेली कपात याला कारणीभूत होती. रशियाने उत्पादन कमी करण्याचं मान्य न केल्यानं सौदीने हा निर्णय घेतला. या दोन्ही देशांमधील वादाचा फायदा भारताला होऊ शकतो.

कच्च्या तेलांच्या दरात 30 टक्क्यापर्यंत घट झाल्यानं आयात शुल्क कमी होऊन मोठी बचत होईल. यामुळे पेट्रोलचे दर जवळपास 50 रुपये प्रतिलिटर इतके होऊ शकतात. सध्या देशात पेट्रोलचे दर 70 रुपयांपर्यंत आहेत.

भारतीय बाजारात कच्च्या तेलाच्या एका बॅरेलची किंमत 47.92 डॉलर इतकी आहे. म्हणजेच सध्याच्या दरानुसार एक क्रूड बास्केट 3530 रुपयांपर्यंत पडेल. यात 30 टक्के दर कमी झाल्यास बॅरेलची किंमतही घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या वेळी क्रूड बास्केटची आयात करताना त्याचा दर 2470 रुपये असू शकतो. याचा फायदा सर्वसामन्यांपर्यंत पोहोचवायचा ठरला तर पेट्रोलचे दर 50 रुपयांपर्यंत कमी होतील.

हे वाचा : पोस्टाची विशेष योजना, 100 रुपयांच्या गुंतवणुकीतून होणार मोठा फायदा

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Prices Today) किंमतीत मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. देशातील प्रमुख महानगरांमध्ये सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या प्रति लिटर किंमतींमधून 23 ते 25 पैसे कमी केले असून डिझेलच्या किमतीमधून 25 ते 26 प्रति लिटर कमी करण्यात आले आहेत. यानंतर नवी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमती 70.59 रुपये झाली असून एक लिटर डिजेलच्या किंमतीत 63.22 रुपये खर्च करावे लागणार आहे. तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल करतात.

कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये 10 टक्क्यांची घसरण

दोन दिवसांपूर्वी (शुक्रवारी) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीमध्ये 10 टक्क्यांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. OPEC देशांनी प्रोडक्शनमध्ये कपात न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या कारणामुळे भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रति लिटर 4 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. US WTI आणि ब्रेंट क्रुड (Brent Crude Oil) च्या दरातही घट झाली आहे. दोन्ही कच्च्या तेलांची किंमत क्रमश: 10.07 % आणि 9.4 टक्क्यांनी उतरली आहे.

हे वाचा : YES Bank: राणा कपूर यांच्या मुलीला मुंबई एअरपोर्टवर रोखलं, जात होती लंडनला

 

First published: March 9, 2020, 4:54 PM IST
Tags: petrol

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading