कोण म्हणतं मंदी आहे? मुंबईत विकला जातोय 66 कोटींचा एक फ्लॅट; सर्वांत महाग प्रॉपर्टीची किंमत वाचून व्हाल अवाक

कोण म्हणतं मंदी आहे? मुंबईत विकला जातोय 66 कोटींचा एक फ्लॅट; सर्वांत महाग प्रॉपर्टीची किंमत वाचून व्हाल अवाक

बांधकाम उद्योगावर मंदीचं सावट आहे, फ्लॅट रिकामे पडून आहेत अशा बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पण या सगळ्या चित्राला छेद देणारी ही बातमी वाचा. सर्वात महागड्या प्रॉपर्टीची किंमत ऐकून डोळे होतील पांढरे!

  • Share this:

मुंबई, 9 मार्च : बांधकाम उद्योगावर मंदीचं सावट आहे, रिअल इस्टेट क्षेत्राला वाईट दिवस आहेत. फ्लॅट रिकामे पडून आहेत. विकले जात नाहीत, भाव पडले आहेत. अशा बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पण या सगळ्या चित्राला छेद देणारी ही बातमी वाचा. मुंबईमध्ये गेल्या 6 महिन्यांत तब्बल 1800 कोटींना 63 सुपर लक्झरी फ्लॅट विकले गेले आहेत. शिवाय आलिशान, अत्याधुनिक सुविधा असलेली बिझनेस प्रॉपर्टीसुद्धा चढ्या भावात विकली गेली आहे. मुंबईत 9000 चौरस फुटांच्या प्रॉपर्टीला किती पैसे मोजले गेले ते ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील. लोअर परळ भागातली हीच प्रॉपर्टी मुंबईतही सर्वांत महागडी जागा ठरली.

दक्षिण आणि मध्य मुंबईत गेल्या सहा महिन्यात लक्झरी अपार्टमेंटची विक्री झाली, त्याबद्दलचा रिपोर्ट टाइम्स ऑफ इंडियाने छापला आहे. रिअल इस्टेटला मंदीची झळ अशा बातम्यांमध्ये हा रिपोर्ट निश्चितच लक्षवेधी ठरतो आहे. या रिपोर्टनुसार, मुंबईत लोअर परळला एक 9200 चौ. फुटांची जागा तब्बल 78.3 कोटींना विकली गेली. ही मुंबईतली सर्वात महागडी मालमत्ता समजली जात आहे. इंडियाबुल्स ब्लू कॉम्प्लेक्समधला ही दुमजली प्रॉपर्टी विक्रमी भावात विकली गेली आहे.

कुठला भाग सर्वांत महाग

याशिवाय ब्रीच कँडी क्लबजवळ बिशप्स गेट इथे 5 बेडरूमचे डुप्लेक्स फ्लॅट तब्बल 66 कोटींना एक या दराने विकले गेले आहेत.

त्याखालोखाल वरळी भागात 55 कोटींना एक या दराने पाच फ्लॅट विकले गेले आहेत.

वाचा - 1 एप्रिलपासून बदलणार PAN, आयकर, GSTचे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

ओबेरॉय रिअॅल्टीजच्या 360 वेस्ट नावाच्या आलिशान रेसिडेन्शिअल टॉवरमध्ये हे पाच फ्लॅट 55 कोटींच्या दरात विकले गेले आहेत.

मुंबईत लक्झरी अपार्टमेंटची विक्री चांगली झाली आहे. देशात अशा प्रकारच्या सुखसोयींनी सज्ज आलिशान घरांसाठी मुंबई हेच मोठं मार्केट असल्याचं मानलं जातं. आर्थिक मंदीचा किंवा बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचा या हायएंड प्रॉपर्टीच्या विक्रीत फारसा परिणाम दिसत नाही, असं म्हणायला हवं.

अन्य बातम्या

Infosys च्या 3 सॉफ्टवेअर इंजिनीअरना अटक; करदात्यांनाच लुबाडलं

YES Bank ग्राहक अद्यापही नाही काढू शकत एटीएममधून पैसे, बँकेने दिलं हे उत्तर

First published: March 9, 2020, 6:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading