मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

येस बँक प्रकरणात जोडलं गेलं मलायकाच्या बॉयफ्रेंडचं नाव, म्हणे 'अर्जुन कपूरमुळे बुडली बँक'

येस बँक प्रकरणात जोडलं गेलं मलायकाच्या बॉयफ्रेंडचं नाव, म्हणे 'अर्जुन कपूरमुळे बुडली बँक'

सध्या सगळ्यात जास्त चर्चा असते ती मलाइका आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशिपची. आता त्या दोघांनीही ते जाहीर केल्यामुळे त्यांचं सगळं खुल्लम खुल्ला सुरू असतं. मलाइका अरोर आणि अरबाज खान यांनी 2016मध्ये घटस्फोट घेतला होता.

सध्या सगळ्यात जास्त चर्चा असते ती मलाइका आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशिपची. आता त्या दोघांनीही ते जाहीर केल्यामुळे त्यांचं सगळं खुल्लम खुल्ला सुरू असतं. मलाइका अरोर आणि अरबाज खान यांनी 2016मध्ये घटस्फोट घेतला होता.

येस बँकेच्या (YES BANK) परिस्थितीवरून कमाल खानने (KAMAL KHAN) ट्विटवरवर अभिनेता अर्जुन कपूरला (ARJUN KAPOOR) खोचक असा टोला लगावला आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 10 मार्च : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) येस बँकेवर (YES bank) निर्बंध लादलेत. ज्यामुळे ग्राहकांना मोठा फटका सहन करावा लागतो आहे आणि या परिस्थितीचं खापर कमाल खानने (kamal khan) अभिनेता अर्जुन कपूरवर (arjun kapoor)फोडलं आहे. येस बँकेच्या या परिस्थितीला अर्जुन कपूर जबाबदार आहे, असं म्हणत कमाल खाननं अर्जुन कपूरला टोला लगावला आहे. येस बँक प्रकरणाशी अर्जुन कपूरचा संबंध जोडत कमाल खानने खोचक असं ट्विट केलं आहे. कमाल खानने या ट्विटमध्ये म्हटलं आहे, 'अर्जुन कपूरने आतापर्यंत ज्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे ते सर्व चित्रपट जवळपास बुडाले आहेत. त्याचा '2 स्टेट' हा चित्रपट मात्र सुपरहिट ठरला, या चित्रपटात तो येस बँकेत काम करत असल्याचं दाखवण्यात आलं होतं आणि आता तर येस बँकच बुडाली.' हे वाचा - आता तुमच्या बॅंक चेकमध्ये होणार मोठा बदल, RBI आणणार नवीन सिस्टम भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) येस बँकेवर निर्बंध लादलेत. येस बँकेची पत ढासळल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. ज्यामुळे ग्राहक संकटात सापडलेत.  येस बँकेच्या खातेदारांना 5 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान बँकेतून फक्त 50 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. येस बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून SBI चे माजी मुख्य वित्त अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खातेदारांनी घाबरू नये, असं आवाहनही रिझर्व्ह बँकेने केलं आहे. दरम्यान, गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने घोटाळ्यामुळे पीएमसी बँकेवरही निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे खातेदारांचे मोठे हाल झाले आहे.
First published:

Tags: Arjun kapoor, Kamal khan, Yes bank

पुढील बातम्या